बकरी ईदच्या निमित्ताने ताजमहालमध्ये तीन तास मोफत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 15:08 IST2019-08-11T15:05:11+5:302019-08-11T15:08:55+5:30
कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.

बकरी ईदच्या निमित्ताने ताजमहालमध्ये तीन तास मोफत प्रवेश
आग्रा - कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. बकरी ईदनिमित्तताजमहालमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश करता येणार आहे. 12 ऑगस्ट रोजी बकरी ईदनिमित्त ताजमहालमध्ये तीन तास मोफत प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या दिवशी विशेष नमाज पठणासाठी ताजमहालमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम नागरीक येत असतात. तसेच पर्यटकांची संख्या ही जास्त असते. त्यामुळे 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान तीन तासांच्या कालावधीत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र दहानंतर पर्यटकांकडून नेहमीप्रमाणे शूल्क आकारले जाणार आहे. ताजमहालमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. आग्रा येथील 'ताजमहाल' जगातील सात आश्चर्यांपैकी एक असल्याने पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात.