पत्नीसाठी त्याने तुरुंगातच बनवला ताजमहाल
By admin | Published: December 27, 2016 04:50 PM2016-12-27T16:50:27+5:302016-12-27T16:50:27+5:30
आपल्या प्रिय व्यक्तीला अनेकजण ताज महालाची प्रतिकृती भेट म्हणून देतात. पण उत्तर प्रदेशमधील तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या एका फ्रेंच कैद्याने कमालच केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - प्रेमाचे प्रतीक म्हणून जगभरात विख्यात असलेल्या ताजमहालाच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला अनेकजण ताज महालाची प्रतिकृती भेट म्हणून देतात. पण उत्तर प्रदेशमधील तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या एका फ्रेंच कैद्याने कमालच केली आहे. त्याने आपल्या पत्नीला नववर्षाची भेट म्हणून चक्क तुरुंगातच ताज महाल बनवला आहे.
एटवर्ट पास्कल हा फ्रेंच नागरिक उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथील कारागृहात अंमली पदार्थविरोधी अधिनियमांतर्गत कारावासाची शिक्षा भोगत आहे. आपल्या पत्नीला नववर्षाची काहीतरी आगळी वेगळी भेट देण्याची पास्कलची इच्छा होती. त्यासाठी त्याने तुरुंगातच ताज महाल बणवण्यास सुरुवात केली. त्याने आगपेटीतील काड्या आणि फेव्हिकोलच्या मदतीने हा ताजमहाल साकारला असून, त्याच्या या कलाकारीचे तुरुंग प्रशासनाकडून कौतुक होत आहे. त्याने पत्नीसाठी तयार केलेली ही भेट नव्यावर्षी तिला देता यावी, यासाठी तुरुंग प्रशासनाने योग्य व्यवस्था केली आहे.