Taj Mahal: "हिम्मत असेल तर ताजमहलला मंदिर बनवून दाखवा", मेहबूबा मुफ्तींचे भाजपला खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 04:53 PM2022-05-10T16:53:12+5:302022-05-10T16:53:21+5:30

Taj Mahal: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर आता ताजमहालचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ताजमहालच्या 22 बंद खोल्या उघडल्या पाहिजेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Taj Mahal: "If you have the guts, make Taj Mahal a temple", Mehbooba Mufti openly challenges BJP | Taj Mahal: "हिम्मत असेल तर ताजमहलला मंदिर बनवून दाखवा", मेहबूबा मुफ्तींचे भाजपला खुले आव्हान

Taj Mahal: "हिम्मत असेल तर ताजमहलला मंदिर बनवून दाखवा", मेहबूबा मुफ्तींचे भाजपला खुले आव्हान

Next

Taj Mahal: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर आता ताजमहालचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ताजमहालच्या 22 बंद खोल्या उघडल्या पाहिजेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या खोल्यांमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्ती असण्याची शक्यता याचिकेतून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यावरुन भाजपला मोठे आव्हान दिले आहे.

ताजमहालला मंदिर बनवून दाखवा
"तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याला मंदिर बनवून दाखवा, मग बघूया भारतात किती लोक ते बघायला येतील", असे थेट आव्हान पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी दिले आहे. "भाजप लोकांना रोजगार देऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. महागाई नियंत्रणात आणता येत नाही. देशाची संपत्ती विकली जात आहे. आज आपला देश बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ यांच्याही मागे गेला आहे. पण या लोकांना याची चिंता नाही. देशातील पैसा लुटून पळून गेलेल्यांना परत आणण्याऐवजी या लोकांना मुघल काळात बांधलेल्या मालमत्ता नष्ट करायच्या आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.

ताजमहालच्या सर्वेक्षणाची मागणी
ताजमहालमध्ये हिंदूंच्या मूर्ती असल्याचा दावा करणारी याचिका लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यासोबतच ताजमहालचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ताजमहालखाली शिवमंदिर असून इमारतीच्या 22 बंद खोल्यांमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्ती असल्याचा दावा केला जात आहे, त्यामुळेच या खोल्या उघडण्याचा मुद्दा या याचिकेत मांडण्यात आला आहे. ज्ञानपवी मशिदीच्या सर्वेक्षणावरून देशात यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. आता ताजमहालवरूनही राजकारण सुरू झाले आहे. ज्ञानवापीचे सर्वेक्षण योग्य असून मंदिर पाडून येथे मशीद कशी बांधली, हे सत्य लोकांसमोर यावे, अशी भाजपची मागणी आहे.

Web Title: Taj Mahal: "If you have the guts, make Taj Mahal a temple", Mehbooba Mufti openly challenges BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.