Taj Mahal: ‘ताजमहाल आमची प्रॉपर्टी, शाहजहाँनने आमच्या पॅलेसवर कब्जा केला’, भाजपाच्या महिला खासदारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:04 PM2022-05-11T19:04:31+5:302022-05-11T19:05:21+5:30

Taj Mahal News: जयपूरच्या माजी राजघराण्याच्या प्रिंसेस आणि भाजपाच्या खासदार दीया कुमारी यांनी ताहमहाल ही आमची प्रॉपर्टी आहे. तो आमच्या कुटुंबाच्या पॅलेसच्या मालमत्तेवर उभा आहे. आमच्याकडे अशी कागदपत्रे आहेत, असा दावा केला आहे.

‘Taj Mahal is our property, Shah Jahan took over our palace’, claims BJP women MPs | Taj Mahal: ‘ताजमहाल आमची प्रॉपर्टी, शाहजहाँनने आमच्या पॅलेसवर कब्जा केला’, भाजपाच्या महिला खासदारांचा दावा

Taj Mahal: ‘ताजमहाल आमची प्रॉपर्टी, शाहजहाँनने आमच्या पॅलेसवर कब्जा केला’, भाजपाच्या महिला खासदारांचा दावा

Next

नवी दिल्ली - आग्रा येथील ताजमहालावर जयपूरच्या माजी राजघराण्याने आपला दावा सांगितला आहे. जयपूरच्या माजी राजघराण्याच्या प्रिंसेस आणि भाजपाच्या खासदार दीया कुमारी यांनी ताहमहाल ही आमची प्रॉपर्टी आहे. तो आमच्या कुटुंबाच्या पॅलेसच्या मालमत्तेवर उभा आहे. आमच्याकडे अशी कागदपत्रे आहेत, जी ताजमहाल हा जयपुरच्या माजी राजघराण्याचा एक पॅलेस होता, याला दुजोरा देतात. या पॅलेसवर पुढे शाहजहानने कब्जा केला.

दीया कुमारी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, जेव्हा शाहजहानने जयपूर राजघराण्याचा तो पॅलेज आणि जमीन घेतली होती. त्यावेळी मुघलांचं राज्य होतं. त्यामुळे त्यांना विरोध करणे शक्य नव्हते. आजसुद्धा कुठलेही सरकार कुठलीही जमीन अधिग्रहित करते तेव्हा त्याच्या बदल्यात नुकसान भरपाई दिली जाते. मात्र त्यावेळी असा कुठला कायदा नव्हता. त्यामुळे त्याबाबत दाद मागणे शक्य नव्हते. आता कुणीतरी याबाबत कोर्टात याचिका दाखल केली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे.

दीया कुमारी यांनी सांगितले की, बंद खोल्या उघडून ताजमहाल हा आधी काय होता, याचा शोध घेतला गेला पाहिजे. ताज महाल तोडला पाहिजे, असं मी म्हणणार नाही. मात्र त्याच्या काही खोल्या उघडल्या पाहिजेत. त्यांनी सांगितले की, ताजमहालामधील काही खोल्या बंद आहेत. काही भाग दीर्घकाळापासून उघडलेले नाहीत. त्याची निश्चितच चौकशी झाली पाहिजे, तसेच ते उघडले पाहिजेत. त्यामुळे तिथे काय होते काय नव्हते हे सर्वांसमोर येईल. या सर्व दाव्यांची योग्य चौकशी झाल्यावरच याबाबतची निश्चित माहिती समोर येईल, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: ‘Taj Mahal is our property, Shah Jahan took over our palace’, claims BJP women MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.