गुजरात दंगलीतील दोषींवरही कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 05:45 IST2018-12-19T05:44:37+5:302018-12-19T05:45:05+5:30
केजरीवाल : चिथावणी देण्यामागे राजकीय पक्ष

गुजरात दंगलीतील दोषींवरही कारवाई करा
नवी दिल्ली : शीखविरोधी दंगलीसारखीच गुजरात आणि मुजफ्फरनगर दंगल घडवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे नेते सज्जनकुमार यांच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. केजरीवाल म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिम एकमेकांविरुद्ध लढू इच्छित नाहीत. ते सद्भावनेसह राहू इच्छितात; पण या दंगली राजकीय पक्ष त्यांना प्रोत्साहित करतात.
शीखविरोधी दंंगल प्रकरणात सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. यासाठी खूप काळ गेला. उशीर झाला; पण निर्णय आला. ते म्हणाले की, १९८४ च्या दंगलीतील अन्य मोठ्या नेत्यांनाही शिक्षा होईल, अशी मला अपेक्षा आहे, तसेच गुजरातमधील २००२ च्या दंगलीतील आणि २०१३ च्या मुजफ्फरनगर दंगलीत सहभागी असलेल्यांवरही कारवाई व्हायला हवी. कठोर शिक्षा दिल्यास भविष्यात अशा घटना होणार नाहीत, असेही ते म्हणाले.