वृध्दाला डांबून ठेवणार्यावर कारवाई करा
By admin | Published: August 14, 2016 01:08 AM2016-08-14T01:08:43+5:302016-08-14T01:08:43+5:30
जळगाव: शिंपी समाजाचे पदाधिकारी दत्तात्रय विठ्ठल वारुळे (वय ६५ रा.कांचन नगर, जळगाव) यांना शिंपी समाज संस्थेच्या मनोरमाबाई जगताप मंगल कार्यालयात डांबून ठेवणार्या विवेक अनिल जगताप यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी मागणी संस्थेच्या पदाधिकार्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे केली आहे. जगताप यांनी १२ ऑगस्ट रोजी वारुळे यांच्याकडे सभासद पावतीची मागणी करुन त्यांना मंगल कार्यालयाला कुलूप लावून डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Next
ज गाव: शिंपी समाजाचे पदाधिकारी दत्तात्रय विठ्ठल वारुळे (वय ६५ रा.कांचन नगर, जळगाव) यांना शिंपी समाज संस्थेच्या मनोरमाबाई जगताप मंगल कार्यालयात डांबून ठेवणार्या विवेक अनिल जगताप यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी मागणी संस्थेच्या पदाधिकार्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे केली आहे. जगताप यांनी १२ ऑगस्ट रोजी वारुळे यांच्याकडे सभासद पावतीची मागणी करुन त्यांना मंगल कार्यालयाला कुलूप लावून डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.आव्हाण्याची विवाहिता पळसोद येथून बेपत्ताजळगाव: तालुक्यातील आव्हाणे येथील शोभाबाई रमेश सपकाळे (वय ३८) या पळसोद (ता.जळगाव) येथील बहीण देवकाबाई प्रकाश शिरसाठ यांच्या घरातून ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे पाच वाजता बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी पती रमेश काशीनाथ सपकाळे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास गणेशकुमार नायकर करीत आहेत.रथ यात्रेचे आयोजनजळगाव: स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक (बालसंस्कार केंद्र) आनंद नगर येथे १८ व १९ ऑगस्ट रोजी रथ यात्रा काढण्यात येणार आहे. रथयात्रेची सुरुवात शांताई सभागृहापासून होईल. हतनूर सभागृहात सकाळी साडे दहा वाजता नैवेद्य आरती व ११.३० वाजता संभाजी नगरातील दत्त मंदिरात पालखी येईल. १९ रोजी पादुका पूजन, धान्य अभिषेक होईल.