रात्रीही काढा क्वालिटी फोटो, व्हॉट्सअॅपचं जबरदस्त फीचर
By admin | Published: July 5, 2017 04:45 PM2017-07-05T16:45:28+5:302017-07-05T16:58:06+5:30
व्हॉट्सअॅप जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. जगभरात जवळपास 1.2 अब्ज युजर्स या अॅपच्या विविध फीचर्सची मजा घेतात.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - व्हॉट्सअॅप जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. जगभरात जवळपास 1.2 अब्ज युजर्स या अॅपच्या विविध फीचर्सची आनंद घेतात. मात्र, एका फीचरच्या बाबतीत व्हॉट्सअॅपला इतर अॅप पिछाडीवर सोडतात आणि ते म्हणजे कॅमेरा. युजर्सच्या याच तक्रारीला दूर करताना व्हॉट्सअॅपने नवं अपडेट जारी केलं आहे.
रात्रीच्या वेळी उत्तम फोटोसाठी व्हॉट्सअॅपने नाईट मोड फीचर आणणार आहे. हे नवं फीचर आधी आयओएसमध्ये येईल.अँड्रॉईड युझरना या फीचरसाठी थोडी वाट पाहावी लागेल. हे फीचर किती दिवसात युझरसाठी उपलब्ध होईल, याबाब अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या फीचरद्वारे कमी प्रकाशातही युझर चांगेल फोटो क्लिक करु शकतील. या नव्या अपडेटसह व्हॉट्सअॅपच्या कॅमेरा UIमध्ये नवं बटण अॅड होईल. या बटण किंवा फीचरमध्ये कमी प्रकाशात काढलेल्या फोटोंची क्वालिटी आणखी चांगली करण्याची क्षमता असेल. व्हॉट्सअॅपचं इन-अॅप कॅमेरा ओपन केल्यास उजव्या बाजुला एक चंद्रासारखा आयकॉन दिसेल, जो फ्लॅश आयकॉनला अगदी लागून असणार आहे. नाइट मोड सुरू करण्यासाठी या आयकॉनला टॅप करावं लागेल.
हे नवं फीचर एका साध्या अपडेट सारखं असलं तरी ज्या ठिकाणी फ्लॅशचा वापर करणं शक्य नाही अशा परिस्थितीत हे फीचर उपयोगात येईल, तसंच हे फीचर सेल्फी कॅमे-यालाही सपोर्ट देण्याचं काम करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आता लवकरच व्हॉट्सअॅप वर शेअर करा काहीही-
टेक्नोसॅव्ही जगतात बऱ्याच दिवसांपासून ज्या व्हॉट्सअॅप फिचरची लोक वाट पाहात होते ते फिचर आता लवकरच व्हॉट्सअॅप युझर्सना उपलब्ध होणार आहे. ते बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित फिचर म्हणजे ऑल फाईल शेअर. टेक्नोसॅव्ही जगतात व्हॉट्सअॅप हे फीचर कधी सुरु करतो यावर जगभरातील टेक्नोप्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र व्हॉट्सअॅप लवकरच हे फीचर टेक्नोप्रेमींसाठी खुले करणार आहे. आता सध्या व्हॉट्सअॅपवर आपण फोटो, व्हिडीओ तसेच डॉक फाईल्स शेअर करू शकतो मात्र लवकरच आणखी इतरही फाईल फॉरमॅट आपण शेअर करू शकू .