आझम खान यांची जीभ आणा, 50 लाखांचं बक्षीस मिळवा- विहिंपच्या नेत्याची घोषणा
By admin | Published: July 1, 2017 10:47 AM2017-07-01T10:47:57+5:302017-07-01T11:06:03+5:30
विश्व हिंदू परिषदेचे शहाजहाँपूरमधील जिल्हा समन्वयक राजेश कुमार अवस्ती यांनी आझम खान यांची जीभ आणणाऱ्याला 50 लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
शहाजहाँपूर, दि, 1- समाजवादी पक्षाचे नेते आझन खान यांनी भारतीय जवानांबद्दल केलेल्या टीकेवर सर्वच स्तरातून टीका होते आहे. विश्व हिंदू परिषदेचे शहाजहाँपूरमधील जिल्हा समन्वयक राजेश कुमार अवस्ती यांनी आझम खान यांची जीभ आणणाऱ्याला 50 लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते अवस्ती यांनी माध्यमांसमोर 50 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ते म्हणाले, "जो व्यक्ती आझम खान यांची जीभ कापून आणेल त्याला तात्काळ 50 लाख दिले जातील". अवस्ती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आझम खान यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
"भारतीय जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना आझम खान यांना लाज वाटायला हवी होती", त्यांना भारतात राहण्याचा काहीही अधिकार नाही, त्यांनी त्वरीत भारत सोडून गेलं पाहिजे, असंही विश्व हिंदू परिषदेचे नेते राजेश कुमार अवस्ती म्हणाले आहेत.
आझम खान यांनी भारतीय जवानांवर बलात्काराचा आरोप केला होता. आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसले. "महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे"", असं आझम खान म्हणाले.
आणखी वाचा:
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार आझम खान यांनी अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ताज्या घटनेबद्दल बोलायचं झाल्यास बुलंदशहर सामूहिक बलात्कारावर त्यांनी केलेलं वक्तव्य. या सामूहिक बलात्काराला त्यांनी एक राजकीय षडयंत्र म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांच्या या वक्तव्याचं उत्तर मागितलं, तेव्हा मात्र आपल्या वक्तव्याच्या विपर्यास केल्याची पळवाट त्यांनी काढली. नंतर त्यांनी विनाअट माफीदेखील मागितली. न्यायालयाने त्यांचा हा माफीनामा स्विकार केला होता.