पावसाळयात वीज यंत्रणेपासून काळजी घ्या

By admin | Published: June 8, 2016 01:50 AM2016-06-08T01:50:50+5:302016-06-08T01:50:50+5:30

महावितरणचे आवाहन :

Take care of the electricity during the monsoon season | पावसाळयात वीज यंत्रणेपासून काळजी घ्या

पावसाळयात वीज यंत्रणेपासून काळजी घ्या

Next
ावितरणचे आवाहन :

पुणे : अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.
मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणा-या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नयेत अशा सूचनाही महावितरणकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत जनजागृती करणारी पत्रके तयार करण्यात आली असून ती ठिकठिकाणी लावण्यातही आलेली आहेत.
धोका टाळण्यासाठी ही काळजी घ्यावी ...
* वीजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
* घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी.
*घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा.
* घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीजतारांपासून दूर ठेवावे.
* ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये.
* विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
* विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे.
* विशेषत: पत्र्याच्या घरात राहणा-या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
*विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत,
* विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत

Web Title: Take care of the electricity during the monsoon season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.