आता पेट्रोल कार बाळगणो स्वस्त!
By admin | Published: September 4, 2014 01:52 AM2014-09-04T01:52:48+5:302014-09-04T01:52:48+5:30
पेट्रोल स्वस्त, तर डिङोल महागले आहे. दरातील वाढ-घट पाहता पेट्रोल आणि डिङोलच्या दरातील तफावत जूनपासून खूपच कमी झाली आहे.
Next
इंधन दरातील तफावत कमी : दरमहा खर्च दोन हजार रुपये
चेन्नई : पेट्रोल कारच्या तुलनेत इंधनाचा खर्च कमी येतो, त्यामुळे डिङोल कार परवडते? असा आजवरचा समज असला तरी प्रत्यक्षात तसे नाही बरं का? कारण असे की, अलीकडच्या काही महिन्यांत एकीकडे पेट्रोल स्वस्त, तर डिङोल महागले आहे. दरातील वाढ-घट पाहता पेट्रोल आणि डिङोलच्या दरातील तफावत जूनपासून खूपच कमी झाली आहे. याचा विचार करता डिङोल कारपेक्षा पेट्रोल कारच वापरणो परवडणारे आहे.
31 ऑगस्ट रोजी पेट्रोल स्वस्त करताना डिङोलच्या दरात प्रति लिटर 5क् पैशांची वाढ केली. त्यानुसार पेट्रोल आणि डिङोलच्या दरातील तफावत 9.15 रुपये ते 12 रुपयांदरम्यान आली. नवीन वाहन प्रति लिटर 14 ते 15 कि.मी. मायलेज देते. त्यानुसार दिवसाकाठी 5क् कि.मी.साठी 4 पेट्रोल लागते. म्हणजे महिन्याकाठी 12क् लिटर पेट्रोल लागेल. मुंबई किंवा चेन्नई यासारख्या इंधनावर खूप खर्च कराव्या लागणा:या शहरांत पेट्रोल व डिङोल कार वापरण्यातील फरक 1 हजारांचा आहे. कर्जाच्या हप्त्याच्या रकमेच्या ही निम्मी रक्कम आहे. पेट्रोल आणि डिङोल दरातील तफावत पाहता दिल्लीत डिङोल कार वापरली, तर महिन्याकाठी 11क्क् रुपयांची बचत होईल. मुंबईत एवढीच बचत पदरी पडेल. (प्रतिनिधी)