31 मार्चपूर्वी आधारकार्डची 'ही' आठ कामं उरकून घ्या..अन्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:51 PM2018-03-09T17:51:17+5:302018-03-09T17:53:09+5:30

31 मार्चच्या आधी आधार लिंक न करणाऱ्यांना अनेक तोट्यांना सामोरं जावं लागणार आहे. 

Take off the eight cards from the Aadhar card before March 31. Otherwise | 31 मार्चपूर्वी आधारकार्डची 'ही' आठ कामं उरकून घ्या..अन्यथा

31 मार्चपूर्वी आधारकार्डची 'ही' आठ कामं उरकून घ्या..अन्यथा

Next

मुंबई - आर्थिक तसंच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक केलं आहे. गुंतवणुकीपासून ते बँक अकाऊंटचा वापर करण्यासाठी तसंच मोबाइल फोन वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. बँका, मोबाइल नेटवर्किंग कंपन्या तसंच इतर अनेक ठिकाणांहून ग्राहकांना आधार लिंक करण्याचे अलर्टही यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेल्या डेडलाईनमध्ये तुम्हाला ही महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे.  त्यामुळे 31 मार्चच्या आधी आधार लिंक न करणाऱ्यांना अनेक तोट्यांना सामोरं जावं लागणार आहे. 

  • पॅनकार्ड 

आधारकार्डचा नंबर पॅनकार्डशी लिंक करणं सरकारने बंधनकारक केलं आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही आधार-पॅन लिंक केलेलं नाही त्यांच्यासाठी31 मार्चपर्यंत मुदत आहे. आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर आयटी रिटर्न फाइल करता येणार नाही. आयटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया होणार नाही.

  • बँक अकाऊंट 

आधारकार्ड बँक अकाऊंटशी लिंक करणंही सरकारकडून बंधनकारक करण्यात आलं आहे. बँक अकाऊंट नंबर आधारशी लिंक नसेल तर खातेधारकाचं अकाऊंट ब्लॉक केलं जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील हा तोटा टाळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत तुमचा बँक अकाऊंट नंबर आधारकार्ड नंबरशी लिंक करा.

  • मोबाइल नंबर 

मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक करणं बंधनकारक आहे. त्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2018 देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ग्राहकांना मोबाइल नंबर आधारशी लिंक करायचा आहे. तसं न केल्यास तुमचा मोबाइल नंबर डीअॅक्टीवेट केला जाईल.

  • रेशनकार्ड, एलपीजी, पेन्शन सुविधा 

एलपीजी, पेन्शन यासारख्या सरकारी सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. त्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च देण्यात आली असून आधार लिंक नसेल तर सरकारी योजनांपासून मुकावं लागणार आहे.  

  • म्युच्युअल फंड  

म्युच्युअल फंडात ज्यांनी पैसे गुंतविले आहेत त्यांनाही आधार लिंक करणं सक्तीचं आहे. तसं न केल्यास तुमचं म्युच्युअल फंडाचं खातं गैर ठरवलं जाणार आहे. ज्याचं आधारकार्ड लिंक नसेल त्यांचं खातं नॉन ऑपरेटेबल होणार आहे.

  • इन्श्युरन्स पॉलिसी  

इन्श्युरन्स पॉलिसी धारकांनाही आधारकार्ड नंबर लिंक करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही लिंक केलेलं नाही त्यांना 31 मार्चपर्यंत आधारकार्ड लिंक करणं गरजेचं आहे. तसं न केल्यास इन्श्युरन्स पॉलिसीचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.

  • पोस्टाशी संबंधित काम 

पोस्टाशी संबंधित गोष्टी म्हणजेच पीपीएफ, केव्हीपी, ठेवी अशा विविध सुविधांसाठी आधारकार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. 31 मार्चपर्यंत आधार लिंक केलं नाही तर खातेधारकाचं खातं ब्लॉक होणार आहे.

Web Title: Take off the eight cards from the Aadhar card before March 31. Otherwise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.