सरकारची मदत घ्या अन् महिना सहा लाख कमवा; किती लागेल गुंतवणूक?, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:02 AM2023-09-05T08:02:11+5:302023-09-05T08:02:18+5:30
या व्यवसायासाठी फॅक्टरी लायसन्स, प्रदूषण विभागाचे प्रमाणपत्र आणि जीएसटी नोंदणी आवश्यक आहे.
नवी दिल्ली : एकवार वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकवर सरकारने बंदी घातल्यामुळे उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी कार्डबोर्डच्या पेट्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे पुठ्ठ्याचे कार्टन बॉक्स बनविण्याचा व्यवसायही तेजीत आला आहे.
विशेषत: ऑनलाइन खरेदीत यांचा अधिक वापर होत आहे. पुठ्ठ्याशी निर्मितीशी संबंधित कोणताही व्यवसाय करण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग’मध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या व्यवसायात उतरण्यासाठी एमएसएमई नोंदणी करता येते. त्यामुळे शासकीय मदत मिळू शकते. या व्यवसायासाठी फॅक्टरी लायसन्स, प्रदूषण विभागाचे प्रमाणपत्र आणि जीएसटी नोंदणी आवश्यक आहे.
आवश्यक गोष्टी
क्राफ्ट पेपर, पिवळा स्ट्रॉबोर्ड, डिंक शिलाई तार, सिंगल फेज पेपर कॉरगेशन मशीन, रील स्टँड लाइट मॉडेलसह बोर्ड कटर, शीट चिकटणारे मशीन, शीट प्रेसिंग मशीन
किती लागेल गुंतवणूक?
सुमारे २० लाख रुपये
किती होईल उत्पन्न?
मासिक ४ ते ६ लाख