महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना करा - केटीएस तुलसी
By admin | Published: March 3, 2016 03:53 PM2016-03-03T15:53:12+5:302016-03-03T15:53:12+5:30
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील केटीएस तुलसी यांनी केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ३ - महाराष्ट्रामध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून होणा-या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील केटीएस तुलसी यांनी केली आहे. केटीएस तुलसी यांनी शेतकरी आत्महत्येवर बोलताना ही मागणी केली आहे. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात एकूण 3000 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती केटीएस तुलसी यांनी यावेळी दिली.
जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे आणि दुष्काळामुळे 124 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या रोखण्यासाठी देण्यात आलेली आश्वासन फोल ठरल्याचा आरोप केटीएस तुलसी यांनी केला आहे. असं असतानादेखील काही नेते आत्महत्या करण्यासाठी स्पर्धा सुरु असल्याचं वक्तव्य करत आहेत. 90 लाख शेतक-यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. सरकारने या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केटीएस तुलसी यांनी केली आहे.