दहशतवादाविरोधात लढण्याची शपथ घ्या!

By admin | Published: November 27, 2014 02:56 AM2014-11-27T02:56:27+5:302014-11-27T02:56:27+5:30

सहा वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे स्मरण देत दहशतवादाविरुद्ध लढण्याची सार्क देशांनी शपथ घ्यावी, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले.

Take oath to fight against terrorism! | दहशतवादाविरोधात लढण्याची शपथ घ्या!

दहशतवादाविरोधात लढण्याची शपथ घ्या!

Next
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सार्क देशांना आवाहन
 
26/11च्या स्मृतिदिनी टाळली शरीफ यांची भेट
 
पाकला दिला अप्रत्यक्ष इशारा
 
काठमांडू : सहा वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे स्मरण देत दहशतवादाविरुद्ध लढण्याची सार्क देशांनी शपथ घ्यावी, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले. पाकिस्तानी हल्लेखोरांनी 166 जणांचे प्राण घेतलेला हा हल्ला आपण आजही विसरू शकत नाही, असे भावनिक उद्गार सार्कच्या व्यासपीठावरून त्यांनी काढले. भाषणाच्या सुरुवातीस मोदी यांनी इतर देशांच्या प्रमुखांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला, पण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नाव घेतले नाही. शिवाय 26/11 च्या स्मृतिदिनी शरीफ यांची भेटगाठही टाळली. मोदींनी या सूचक कृतीतून पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशाराच दिला. 
मुंबईवरील हल्ल्याच्या भयानक स्मृती आजही पाठ सोडत नाहीत. या हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या स्मृतींमुळे आजही वेदना होतात. आज यानिमित्ताने आपण दहशतवाद व आंतरराष्ट्रीय गुन्हे यांचा बीमोड करण्याची शपथ घेऊ, असे मोदी यांनी सार्क नेत्यांना सांगितले. पंतप्रधानांचे हे भाषण 3क् मिनिटांचे होते. मोदी यांनी भारताचे विविध महत्त्वाच्या क्षेत्रंतील निर्णय जाहीर केले. आरोग्य, विज्ञान, व्हिसा व सार्क राष्ट्रांशी संबंध दृढ करण्याचे निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केले. 
 
मुंबई हल्ला विसरू शकत नाही
मुंबईवर सहा वर्षापूर्वी झालेला हल्ला आपण विसरू शकत नाही, असे ठणकावून सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ सार्कच्या व्यासपीठावर एकत्र आले खरे पण; मोदी यांनी शरीफ यांच्या उपस्थितीकडे लक्षही दिले नाही. 
 
प्रशांत महासागराच्या मध्य भागापासून अटलांटिक सागराच्या द. किना:यार्पयत मला एकतेची लाट दिसली आहे. सीमावाद प्रगतीला अडसर ठरतो. आंतरराष्ट्रीय सहकार्याने विकासाला चालना मिळते. - पंतप्रधान मोदी
 
च्सर्वाच्या प्रय}ाने दक्षिण आशिया शांत व समृद्ध करू या. उर्वरित जगापेक्षा दक्षिण आशियात सामूहिक प्रय}ांची अधिक गरज आहे. भारत, श्रीलंका, बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, नेपाळ, मालदीव व अफगाणिस्तान हे आठ देश एकत्र आले पाहिजेत. 
च्चांगले शेजारी ही आंतरराष्ट्रीय आकांक्षा आहे. आपल्याला एकमेकांच्या सुरक्षेची काळजी असेल तर आपली मैत्री अधिक दृढ होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 
 

 

Web Title: Take oath to fight against terrorism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.