नाशिकमध्ये घ्या पर्यटनाचा आनंद

By admin | Published: March 14, 2015 11:45 PM2015-03-14T23:45:26+5:302015-03-14T23:45:26+5:30

छगन भुजबळ : बी-टू-बी उपक्रमाचे उद्घाटन

Take pleasure in tourism in Nashik | नाशिकमध्ये घ्या पर्यटनाचा आनंद

नाशिकमध्ये घ्या पर्यटनाचा आनंद

Next
न भुजबळ : बी-टू-बी उपक्रमाचे उद्घाटन
नाशिक : झपाट्याने विकसित होणारे १६वे शहर म्हणून नाशिकचा उल्लेख केला जातो, तर महाराष्ट्रातील तिसर्‍या क्रमांकाचे पर्यटनस्थळांचे शहर म्हणूनही नाशिकचा लौकिक असून, पर्यटनासाठी नाशिक हे प्रथम पसंतीचे शहर ठरू शकते. त्यामुळे नाशिकला या अन् पर्यटनाचा आनंद घ्या, असे प्रतिपादन माजी पर्यटनमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व नाशिक टूर ऑपरेटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या टुरिझम कॉन्क्लेव्हच्या बी टू बी या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, ट्रॅव्हल्स एजंटस् असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भालेराव, नगरसेवक सचिन महाजन आदि उपस्थित होते. पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, नाशिक शहर व परिसर खर्‍या अर्थाने सर्व प्रकारच्या पर्यटनास उपयुक्त आहे. पूर्वीपासून धार्मिक कार्यासाठी व कुंभमेळ्यासाठी लाखो पर्यटक, भाविक नाशिकला येतात. त्र्यंबकेश्वर, गंगापूर धरण, सप्तशृंगी गड, येवल्याची पैठणी तसेच शिर्डी देवस्थान जवळच असल्याने नाशिक पर्यटनाच्यादृष्टीने नेहमीच महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जात आहे. जलद, आरामदायी प्रवासासाठी सहा व चार पदरी महामार्ग तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असल्याने पर्यटन वाढीच्यादृष्टीने आणखी प्रयत्न व्हायला हवेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मंडलेचा यांनी केले, तर दत्ता भालेराव यांनी आभार मानले.
---------
(फोटो क्र. १४पीएचएमआर१३३)
ओळी : टुरिझम कॉन्क्लेव्हमध्ये बी-टू-बी कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ व्यासपीठावर दत्ता भालेराव, संतोष मंडलेचा, सचिन महाजन आदि.

Web Title: Take pleasure in tourism in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.