जयललितांची मालमत्ता ताब्यात घ्या

By admin | Published: January 12, 2017 01:07 AM2017-01-12T01:07:32+5:302017-01-12T01:07:32+5:30

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयात

Take possession of Jayalalitha's property | जयललितांची मालमत्ता ताब्यात घ्या

जयललितांची मालमत्ता ताब्यात घ्या

Next

चेन्नई : माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
जयललिता यांचा कोणीही थेट वारस नाही. त्या सार्वजनिक सभेत मी लोकांची आहे, त्यांनी आपली मालमत्ता अन्य कोणाच्या नावावर केलेली नाही वा वारस ठरविलेला नाही. असे नमूद करून संस्थेने ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेसोबत संस्थेने त्यांच्या मालमत्तांची यादी दिली आहे. या सर्व मालमत्ता राज्य सरकारने ताब्यात घेऊन त्यापासून मिळणारे उत्पन्न जनकल्याणासाठी वापरावे, असे म्हटले आहे. ही याचिका न्यायमूर्ती ए. सेल्वम आणि पी. कलाईयारासन यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला येणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Take possession of Jayalalitha's property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.