उरीसारखाच बदला घ्या; अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर नेटकऱ्यांच्या तीव्र भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 06:01 PM2019-02-14T18:01:51+5:302019-02-15T19:04:21+5:30

अवंतीपुरातील या हल्ल्यानंतर देशभरातील तरुणाईकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Take revenge as Uri attack; Avantipura terrorist attack, social media demand and got emotional | उरीसारखाच बदला घ्या; अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर नेटकऱ्यांच्या तीव्र भावना

उरीसारखाच बदला घ्या; अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर नेटकऱ्यांच्या तीव्र भावना

googlenewsNext

जम्मू आणि काश्मीरमधील दहशवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 18 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर, देशभर शोककळा पसरली. तर नेटीझन्सडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत असून आता बसं, अशा प्रतिक्रियाही येत आहेत. तसेच उरीप्रमाणेच या हल्ल्याचाही बदला घ्या, अशी भावनाही नेटीझन्सकडून व्यक्त होत आहेत.  

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येतात त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. 

अवंतीपुरातील या हल्ल्यानंतर देशभरातील तरुणाईकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, सोशल मीडियाद्वारे या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणीही नेटीझन्स करत आहे. हल्ल्याची बातमी समजताच, सर्वच शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत असून सोशल मीडिया भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी केलेल्या पठाणकोठ हल्ल्यातही लष्कराचे 18 जवान शहीद झाले होते. त्यानंतर, पठाणकोठ हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने उरी- येथे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर, देशभर भारतीय सैन्याच्या कामगिरीचा अभिमान बाळगण्यात आला. 

लष्कराने या हल्ल्याला मिशन सर्जिकल स्ट्राईक हे नाव दिले होते. या मिशनअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर, भारतीय सैन्याची ताकत जगभरातील देशांनी अनुभवली. त्यामुळे, आताही उरीप्रमाणेच अवंतीपुरा हल्ल्याचाही बदला घ्या, अशी भावना नेटीझन्स व्यक्त करत आहेत. तर, आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होऊन जाऊ द्या अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करताना दिसत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवरुन नेटीझन्सने या हल्ल्याचा बदला हीच शहीदांना श्रद्धांजली असल्याचं म्हटलंय.      

   







 



 

Web Title: Take revenge as Uri attack; Avantipura terrorist attack, social media demand and got emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.