उत्तर प्रदेशच्या घटनेचा बदला घेऊ

By admin | Published: October 3, 2015 03:28 AM2015-10-03T03:28:04+5:302015-10-03T03:28:04+5:30

उत्तर प्रदेशातील मोहम्मद इकलाख यांच्या हत्येचा बदला घेऊ, अशी धमकी इसिसमध्ये सामील झालेल्या कल्याणच्या फहाद शेख याने दिली आहे

Take revenge of Uttar Pradesh incident | उत्तर प्रदेशच्या घटनेचा बदला घेऊ

उत्तर प्रदेशच्या घटनेचा बदला घेऊ

Next

डिप्पी वांकाणी , मुंबई
उत्तर प्रदेशातील मोहम्मद इकलाख यांच्या हत्येचा बदला घेऊ, अशी धमकी इसिसमध्ये सामील झालेल्या कल्याणच्या फहाद शेख याने दिली आहे. टिष्ट्वटरवरील धमकीत फहाद शेख म्हणतो की, भारतातील मुस्लीम जरी आमचा द्वेष करीत असले तरी आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि गुजरात, काश्मीर आणि मुजफ्फरनगरच्या घटनांचा आम्ही निश्चितच बदला घेऊ.
गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशात एका मुस्लीम व्यक्तीची हत्या झाल्यानंतर देशात या घटनेचे पडसाद उमटत असताना थेट इसिसनेच याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. कल्याणचे चार युवक मागील वर्षी अचानक गायब झाले आणि ते इसिसमध्ये सहभागी झाल्याचे नंतर उघड झाले. यातीलच एक फहाद शेख याने शुक्रवारी टिष्ट्वट करून ही धमकी दिली आहे. फहाद नावाची एक डझन अकाउंट आतापर्यंत बंद करण्यात आली आहेत; पण पुन्हा नव्याने या नावाने अकाउंट ओपन केली जातात.
टिष्ट्वटमध्ये फहाद म्हणतो की, भारतातील हिंदू एकीकडे गोमांस भक्षणाच्या संशयावरून एका मुस्लिमाची हत्या करतात तेव्हा भारतातील मुस्लीम दुसरीकडे शांतता बैठका घेत असतात. अन्य एका टिष्ट्वटमध्ये फहाद म्हणतो की, भारतातील मुस्लिमांवर आम्ही प्रेम करतो, भलेही ते आमचा तिरस्कार करीत असतील. फहादच्या या टिष्ट्वटरचे १०२८ फॉलोअर्स आहेत.
फहादने गुरुवारी अरीब माजीदचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यात बंदूक आणि एक बाइक दिसत होती. इसिसच्या काही लोकांसोबत हा फोटो काढण्यात आला होता. जे चार युवक कल्याणहून इसिसमध्ये गेले होते त्यातील अरीब हा परत आलेला आहे.
इसिसमधून परतलेल्या अरीबने सांगितले होते की, भारतीयांना तिथे क्षुद्र कामे सांगितली जातात. यावर फहादने टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, येथे राहण्यापेक्षा इसिसमध्ये टॉयलेट साफ करणे केव्हाही चांगलेच आहे.

Web Title: Take revenge of Uttar Pradesh incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.