जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 05:02 AM2019-06-28T05:02:56+5:302019-06-28T05:03:27+5:30

दहशतवाद आणि दहशतवादी यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांविरुद्ध (फंडिंग) कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.

Take strong action against terrorist funding in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा

जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा

Next

श्रीनगर  - दहशतवाद आणि दहशतवादी यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांविरुद्ध (फंडिंग) कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. अमित शहा यांनी गुरुवारी जम्मू-काश्मिरातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
शहा यांच्या दोनदिवसीय दौºयाची माहिती देताना मुख्य सचिव बी.व्ही. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, राज्यातील अतिरेकी कारवायांविरुद्ध फास आवळण्याचे गृहमंत्री शहा यांनी सांगितले आहे. राज्यातील प्रमुख सार्वजनिक स्थळांची नावे शहीद पोलिसांच्या नावाने असायला हवीत, असेही शहा म्हणाले. यावेळी राज्यपाल सत्यपाल मलिक, त्यांचे गृह विषयाचे प्रभारी सल्लागार के. विजयकुमार, मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम, उत्तरी सैन्याचे कमांडर ले. जनरल रणबीर सिंह, डीजीपी दिलबाग सिंह, विविध गुप्तचर एजन्सी व निमलष्करी दलाचे प्रमुख या उपस्थित होते. अमित शहा यांनी पंचायत प्रतिनिधींशी चर्चा केली. गतवर्षी ते निवडून आले आहेत. गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच राज्याच्या दौºयावर आले आहेत. (वृत्तसंस्था)

शहीद इन्स्पेक्टरच्या कुटुंबियांची घेतली भेट

अनंतनागमध्ये १२ जून रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस निरीक्षक अरशद अहमद खान यांच्या कुटुंबियांची अमित शहा यांनी गुरुवारी भेट घेतली. शहा यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर बल्गार्दे भागाची घेराबंदी करण्यात आली होती.
या हल्ल्यात ३७ वर्षीय खान जखमी झाले होते. त्यांना विशेष उपचारासाठी नंतर दिल्लीला आणण्यात आले. एम्समध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. खान यांच्या कुटुंबात पत्नी, एक वर्षाचा आणि चार वर्षांचा, अशी दोन मुले आहेत.

Web Title: Take strong action against terrorist funding in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.