‘सूड घ्यायचा तर माझा घ्या, गरिबांचा नव्हे’

By admin | Published: May 20, 2015 02:23 AM2015-05-20T02:23:39+5:302015-05-20T02:23:39+5:30

माझ्यावर सूड उगवताना गरीब आणि शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खा. राहुल गांधी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले.

'Take vengeance, take me, not the poor' | ‘सूड घ्यायचा तर माझा घ्या, गरिबांचा नव्हे’

‘सूड घ्यायचा तर माझा घ्या, गरिबांचा नव्हे’

Next

अमेठी : सूड घ्यायचा तर माझा घ्या. कारण यामुळे माझे काहीही नुकसान होत नाही. उलट काम करण्याची प्रेरणा मला मिळले. मात्र, माझ्यावर सूड उगवताना गरीब आणि शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खा. राहुल गांधी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले. फूड पार्कच्या मुद्दा राहुल यांनी काहीशा भावनिक पद्धतीने लावून धरला.
कामे थांबवून आधीच्या काँगे्रसप्रणीत संपुआ सरकारच्या कार्यांचे श्रेय लाटण्याची फॅशन भाजप सरकारने स्वीकारली आहे. विरोधी बाकांवर असताना भाजप नेते सर्व पैसा अमेठीत जात असल्याचा आरोप करायचे. आता अमेठीत कुठलेच काम झाले नसल्याची ओरड भाजपने चालवली आहे, अशा शब्दांत मंगळवारी पुन्हा एकदा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.
अमेठीच्या तीनदिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संग्रामपूर तहसीलमधील कसारा गावात राहुल बोलत होते.
राहुल गांधी यांच्या हस्ते यावेळी खासदार निधीतून केलेल्या ४८ कामांचे लोकार्पण झाले. यात १३ तहसिलींमधील ४४ रस्ते, दोन सभागृहे आणि दोन प्रतीक्षागृहांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)


आमच्या सरकारने अमेठीत फूड पार्क आणण्याचा ध्यास घेतला; पण केंद्रातील भाजप सरकारने गतवर्षी आमचे हे स्वपन धुळीस मिळवले. आम्ही विकासाची अनेक कामे केली. सहा राष्ट्रीय महामार्ग तयार केले, अनेक रस्ते बांधले. अमेठी-रायबरेली रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण केले. तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागत आहेत. कारण भाजप सरकारने विकास कामे थांबवली आहेत आणि आमच्या सरकारने जे काही केले, त्याचे श्रेय लाटण्याचे काम सुरूकेले आहे. भाजप सरकारसाठी ही एक फॅशन झाली आहे. देशात बनणारे सरकार हे सर्वांचे असावे. सरकारने सर्वांसाठी काम करावे, असेच मी सांगेन. कारण विकासाचा लाभ सर्वांना होतो, असे राहुल म्हणाले.

 

 

Web Title: 'Take vengeance, take me, not the poor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.