धक्कादायक! लॉकडाऊनचा फायदा घेत ४ जण अल्पवयीन मुलीला जंगलात घेऊन गेले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 10:28 AM2020-05-10T10:28:37+5:302020-05-10T10:28:48+5:30
लॉकडाऊनचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन नराधामांनी तिला जंगलात नेलं.
संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 59 हजारांवर गेला आहे. तर 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन नराधामांनी तिला जंगलात नेलं. यानंतर चौघांनी मुलीवर रात्रभर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच पीडित मुलीला बेदम मारहाण केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेच्या दूसऱ्या दिवशी आरोपी पीडित मुलीला गावाबाहेर फेकून चारही आरोपी पसार होण्याच्या तयारीत होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांचा शोध घेत अटक केली. या चार आरोपींपैकी चौथा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.