'ती'ची करुण कहाणी, आधी वडिलांनी व मग मित्रानेच केला घात

By admin | Published: November 18, 2014 01:32 PM2014-11-18T13:32:39+5:302014-11-18T13:43:42+5:30

दिल्लीतील १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आधी तिच्या वडिलांनी व त्यानंतर तिच्या शेजारी राहणा-या मित्रानेच लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

The tale of 'she' was done by the elders and the friend | 'ती'ची करुण कहाणी, आधी वडिलांनी व मग मित्रानेच केला घात

'ती'ची करुण कहाणी, आधी वडिलांनी व मग मित्रानेच केला घात

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ -  गेल्या वर्षाभरापासून वडिलांकडून होणारे लैंगिक शोषण आणि आजारी आईने त्यावर बाळगलेले मौन यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या मुलीने तिची कर्मकहाणी शेजारी राहणा-या तरुणाला सांगितली. मात्र या तरुणानेही केवळ मानसिक आधार देण्याचा दिखावा करत त्या मुलीवरच बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना दिल्लीमध्ये उघडकीस आली आहे. 
दिल्लीतील राजस्थान कॉलनी या भागात राहणारी १५ वर्षाची मुलगी दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील मेट्रो स्थानकाबाहेर एकटीच बसली होती. पोलिसांनी या मुलीची चौकशी केली असता तिची करुण कहाणी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
पीडित मुलगी, इलेक्ट्रीशियनचे काम करणारे वडिल, हृदयविकाराने ग्रासलेली आई व भाऊ असे चौघे जण राहतात. पीडित मुलीचे वडिल मद्यधुंद अवस्थेत तिचे लैंगिक शोषण करायचे. गेल्या वर्षभरापासून हा किळसवाणा प्रकार सुरु होता. पिडीत मुलीने या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. मात्र आईनेही त्यावर मौन बाळगले. तर भाऊ हा दररोज कामात व्यस्त असल्याने तिने घडलेल्या प्रकाराची माहिती भावाला सांगितली नाही. अखेरीस शेजारी राहणा-या एका तरुणाला तिने वडिलांच्या क्रूरकृत्याची माहिती दिली. त्यानेही तिला धीर देण्याचा दिखावा केला व दोन दिवसांपूर्वी तिला दिल्लीतील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या खचली व तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. म्हणून दिवसभर मेट्रो स्थानकाबाहेर बसून असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत त्या मुलीच्या वडिलांना अटक केली आहे मात्र तिच्यावर बलात्कार करणारा मित्र पसार झाला आहे. 

Web Title: The tale of 'she' was done by the elders and the friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.