Video: व्हॉट एन 'आयडिया', IPS अधिकाऱ्यानं शेअर केला रेस्क्यू 'जुगाड'चा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 08:46 AM2020-08-13T08:46:31+5:302020-08-13T08:48:35+5:30
छत्तीसगड पोलीसमध्ये कार्यरत असलेले बिलासपूर येथील आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बिलासपूर - लोकांकडे अफलातून टॅलेंट आहे, कित्येकदा लहान-सहान गावातील मंडळीसुद्ध चांगले प्रयोगशील असतात. सोशल मीडियामुळे या प्रयोगशील व प्रतिभावान लोकांचं टॅलेंट जगासमोर येत आहे. त्यातून, अनेक जुगाड केलेले व्हिडिओ किंवा फोटो आपण पाहिलेच असतील. आता, पावसाच्या पाण्यात, पुरात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी एका जेसीबी चालकाने भन्नाट आयडिया लढवली. त्यातून तिघांचा जीव वाचविण्यात त्याला यश आलं आहे.
छत्तीसगड पोलीसमध्ये कार्यरत असलेले बिलासपूर येथील आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एका जेसीबी चालकाने जुगाड करत तिघांचा जीव वाचविल्याचे दिसून येते. या व्हिडिओत पावसाच्या पाण्यामुळे आलेल्या पुरात एक चारचाकी गाडी अडकल्याचं दिसून येते. या गाडीत तीन व्यक्ती फसल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. या तिघांची जीव वाचविण्यासाठी धडपड दिसून येते. त्यातच, पाण्याचा प्रवाह गतीवान असल्याने तिथं जायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालं आहे. समजा, तिथं गेलं तरी बाहेर यायचं कसं हाही प्रश्न आहे. मात्र, एका जेसीबी चालकाने भन्नाट आयडिया लढवून जेसीबीच वाहत्या पाण्यात नेला. त्यानंतर, त्या चारचाकी गाडीजवळ जाऊन जेसीबी-पॉकलँडमध्ये त्या तिघांना अगलद उचलल्याचे दिसून येते. त्यामुळे तिघांचाही जीव वाचला असून भन्नाट पद्धत वापरून जेसीबी चालकाने रेस्कू जुगाड केला आहे.
जुगाड़ rescue 😂😝😝 pic.twitter.com/dnUulNnoxB
— Dipanshu Kabra (@ipskabra) August 12, 2020
दरम्यान, सोशल मीडियावर हा रेस्कू जुगाड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यातच, आयपीएस अधिकाऱ्यालाही हा व्हिडिओ आणि जुगाड टॅलेंटचा व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरला नाही.