आधी चेष्टा केली, मग सीमेवर लढा आणि आता धमक्या; तालिबानची पाकिस्तानवर सतत नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 12:53 PM2023-01-04T12:53:10+5:302023-01-04T12:59:05+5:30

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या इशाऱ्यानंतर तालिबानने मंगळवारी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. इस्लामिक गट तालिबानने पाकिस्तानला इशारा दिला आहे.

taliban counter attack pakistan over minister warns strike in afghanistan to eliminate | आधी चेष्टा केली, मग सीमेवर लढा आणि आता धमक्या; तालिबानची पाकिस्तानवर सतत नजर

आधी चेष्टा केली, मग सीमेवर लढा आणि आता धमक्या; तालिबानची पाकिस्तानवर सतत नजर

googlenewsNext

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या इशाऱ्यानंतर तालिबानने मंगळवारी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. इस्लामिक गट तालिबानने पाकिस्तानला इशारा दिला आहे. 'देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास तयार आहे, असं वक्तव्य तालिबानने केले आहे. पाकिस्तानमध्ये टीटीपीच्या सततच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी धमकी दिली होती, या दरम्यानच तालिबानने इशारा दिला आहे. पाकिस्तान टीटीपीच्या तळांवर लष्करी कारवाई करू शकतो.

तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानने केलेले वक्तव्य चिथावणीखोर आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. 'कोणताही मुद्दा किंवा समस्या चर्चेने सोडवली पाहिजे. अशा आरोपांमुळे दोन्ही देशांमधील संबंध खराब होतात, असेही तालिबानने म्हटले आहे. 

होय, मी प्लेबॉय होतो : इम्रान खान; ध्वनिफिती बाजवा यांनी लीक केल्याचा आरोप

पाकिस्तानचे गृहमंत्री सनाउल्लाह यांच्या इशाऱ्यानंतर तालिबानने पूर्व पाकिस्तानचे मुख्य लष्करी कायदा प्रशासन आणि पाकिस्तानी लष्कराचे कमांडर यांच्यात आत्मसमर्पण दस्तऐवजावर स्वाक्षरी केल्याचे चित्र ट्विट करत पाकिस्तानला टोला लगावला. हे चित्र 1971 मधील आहे जेव्हा अमीर अब्दुल्ला खान नियाझी भारताला शरण आले.

'जर पाकिस्तानने अफगानिस्तानवर हल्ला केला तर त्याचा परिणाम 1971 च्या युद्धासारखा होईल, असा इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे. 

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्पिन बोल्डक चमन सीमेवर अनेक चकमकी झाल्या आहेत. अफगाणिस्तानने चमन सीमेवर नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले होते.'तालिबानच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात दाट वस्त्या आपल्या रडारवर ठेवल्या आहेत, असं पाकिस्तानने म्हटले आहे. 

Web Title: taliban counter attack pakistan over minister warns strike in afghanistan to eliminate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.