गडकरी सांभाळून बोला
By admin | Published: October 12, 2014 01:24 AM2014-10-12T01:24:16+5:302014-10-12T01:24:16+5:30
निवडणूक आयोगाने भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ठेवला असून, भविष्यात गडकरी यांनी सांभाळून बोलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Next
>नवी दिल्ली : ‘येत्या काही दिवसांत तुमच्या नशिबी ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. मिळेल ते खा-प्या, देतील ते ठेवून घ्या. येणा:या लक्ष्मीला नाही म्हणून नका,’ अशा आशयाचे मतदारांना प्रलोभन स्वीकारून मतदान करण्याचे विधान प्रचार सभेत करून निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य बिघडविल्याचा ठपका निवडणूक आयोगाने भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ठेवला असून, भविष्यात गडकरी यांनी सांभाळून बोलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
निलंगा येथील प्रचारसभेत 5 ऑक्टोबर रोजी गडकरी यांनी केलेले उपयरुक्त आक्षेपार्ह विधान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, असे प्रथमदर्शनी वाटल्याने आयोगाने गडकरी यांना नोटिस काढली होती. त्यावर गडकरी यांनी केलेला खुलासा विचारात घेऊन आणि त्या भाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डिग पुन्हा एकदा पाहून गडकरी यांच्या या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करणारा निकाल शनिवारी दिला.
आयोग म्हणतो की, भाषणात असे वक्तव्य करताना गडकरी यांचा अंतस्थ हेतू काहीही असला तरी त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य आणि शुचिता बिघडली हे नक्की.
गडकरी यांनी खुलासा करताना म्हटले होते की, कोणत्याही मार्गाने मतदारांना प्रलोभने दाखविण्याच्या प्रयत्नांची निंदा करणो हाच माङया भाषणाचा मुख्य रोख होता. हे मी विनोदी व वक्रोक्तीपूर्ण शैलीत केले. हल्ली सार्वजनिक जीवनातून विनोदबुद्धी हरवत चालली आहे, हेही मला आवजरून सांगावेसे वाटते. त्यामुळे ‘येणा:या लक्ष्मीला नाकारू’ नका, हे माङो विनोदाने केलेले विधान त्याहूनही अधिक गांभीर्याने केलेल्या ‘कितीही प्रलोभने आली तरी महाराष्ट्राच्या हितासाठी मतदान करा,’ या विधानासोबत विचारात घेतले तर त्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. उलट प्रलोभनांना बळी पडू नका, हेच मला मतदारांच्या मनावर बिंबवायचे होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्निवडणूक प्रक्रिया विशुद्ध राहावी व त्यात सर्वाना समान संधी मिळावी, यासाठी आचारसंहिता तयार केली गेली आहे. त्यामुळे तिचे पालन गांभीर्याने व्हायला हवे. मतदारांना दाखविली जाणारी प्रलोभने हा प्रचारसभेत थट्टेवारी नेण्याचा विषय नाही.
च्त्यामुळे ही आक्षेपार्ह विधाने करून तुम्ही प्रत्यक्षात मतदारांना प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन करीत होतात, हे मान्य करता येण्यासारखे नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे गडकरींचा खुलासा अमान्य करण्यात आला.