पाकिस्तानशी चर्चा करू, पण दहशतवाद थांबल्यावर - सुषमांनी सुनावले
By admin | Published: June 5, 2017 05:19 PM2017-06-05T17:19:04+5:302017-06-05T18:37:08+5:30
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. काश्मीर प्रश्न पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. काश्मीर प्रश्न पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करून सोडवण्यास भारत अनुकूल आहे. मात्र दहशतवादी कारवाया आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकणार नाहीत, असे सुषमांनी पाकिस्तानला सुनावले. तर भारताने कुठलाही दबाव आणि स्वार्थापायी पॅरिस करारावर सही केलेली नाही. त्यामुळे भारत या करारातान माघार घेणार नाही, असे सांगत सुषमांनी ट्रम्प यांनी भारतावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तान प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना सुषमा म्हणाल्या. काश्मीर प्रश्न पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करून सोडवण्यास भारत अनुकूल आहे. पण दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही. तसेच काश्मीर प्रश्नी कुण्या त्रयस्थाची मध्यस्थी भारत मान्य करणार नाही. त्यामुळे पाकिस्तान हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊ शकत नाही."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारावरून भारतावर टीका केली होती. त्यालाही सुषमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "पॅरिस करारावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी भारताबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. भारताने कोणत्याही प्रकारचा स्वार्थ मनात बाळगून किंवा कुणाच्या दबावाखाली येऊन या करारावर सही केलेली नाही. त्यामुळे भारत या करारामधून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोला सुषमांनी ट्रम्प यांना लगावला आहे.
We are very clear, no third party mediation in talks with Pakistan: EAM Sushma Swaraj pic.twitter.com/3pWj11stDD
— ANI (@ANI_news) June 5, 2017