रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 08:18 AM2024-09-25T08:18:07+5:302024-09-25T08:18:24+5:30
दोषींवर अतिशय कठोर कारवाई होईल. रेल्वे अपघात घडविण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत आहेत.
जितेंद्र प्रधान
जयपूर : घातपाती कारवायांद्वारे रेल्वे अपघात घडविण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी केंद्र सरकार विविध राज्यांची सरकारे, पोलिस, एनआयएशी चर्चा करत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
त्यांनी जयपूर विमानतळावर मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, आगामी काळात रेल्वे दुर्घटना घडवून आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या घातपाती कारवाया रोखणे आवश्यक आहे. दोषींवर अतिशय कठोर कारवाई होईल. रेल्वे अपघात घडविण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत आहेत.
कवच यंत्रणेची चाचणी
रेल्वे अपघात टाळण्यासाठी तयार केलेल्या कवच या स्वयंचलित यंत्रणेच्या कार्यक्षमतेची रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या उपस्थितीत मंगळवारी सवाई माधोपूर येथे यशस्वी चाचणी पार पडली. कवच बसविलेल्या इंजिनमधून रेल्वेमंत्र्यांनी प्रवास केला. त्यावेळी कवचची चाचणी झाली.