तामिळी नाट्य - पनीरसेल्वमबाबत शशिकलांचा गौप्यस्पोट
By admin | Published: February 13, 2017 06:40 PM2017-02-13T18:40:51+5:302017-02-13T19:37:38+5:30
तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात रोज नवीन वळण मिळत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि शशिकला यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 13 - तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात रोज नवीन वळण मिळत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि शशिकला यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. दोघेही एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही पक्षाकडून एकमेंकाविरोधात गौप्यसोफट केले जात आहेत. पक्षातील खासदारांनी ओ. पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिल्याने शशिकला यांच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, ५०पैकी १० खासदार आणि ७ आमदार कार्यवाहक मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या बाजूने आल्याने त्यांचे बळ वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर जयललिता यांचं निवासस्थान असलेल्या पोज गार्डनबाहेर जमलेल्या समर्थकांशी संवाद साधताना शशिकला यांनी पन्नीरसेल्वम कसे गद्दार आहेत आणि जयललिता यांच्यावर आपली किती निष्ठा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी मला मुख्यमंत्री होण्यासाठी विचारले होते, परंतु अशा प्रसंगात आपण मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे मी म्हटले होते. आज पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पन्नीरसेल्वम ते कधीच अम्मांप्रति इनानदार नव्हते हे दाखवून दिले आहे, अशी तोफही त्यांनी डागली.
जयललिता यांचा मृत्यू झाला तेव्हापासूनच अण्णा द्रमुक पक्ष फोडण्याचा प्रयत्न होत होता परंतु आपण तो प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही असे त्या म्हणाल्या.