अम्मांच्या राज्यात भाजपाला मिळाला तगडा साथीदार, आता उघडणार का दक्षिणेचं दार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 05:25 PM2019-02-19T17:25:35+5:302019-02-19T17:28:14+5:30
जुना मित्र असलेल्या शिवसेनेसोबतच्या युतीची नव्याने बांधणी झाल्यानंतर आता भाजपासाठी दक्षिणेतून अजून एक खूशखबर आली आहे.
चेन्नई - जुना मित्र असलेल्या शिवसेनेसोबतच्या युतीची नव्याने बांधणी झाल्यानंतर आता भाजपासाठी दक्षिणेतून अजून एक खूशखबर आली आहे. तामिळनाडूमध्येभाजपा आणि सत्ताधारी एआयएडीएमके पक्षांमध्ये आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकत्र येऊन लढणार आहेत. तसेच तामिळनाडू विधानसभेच्या 21 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपा एआयएडीएमकेला पाठिंबा देणार आहे.
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल एआयडीएमकेसोबत आघाडीची चर्चा करण्यासाठी तामिळनाडूमध्ये गेले होते. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
Tamil Nadu Deputy CM O Panneerselvam: AIADMK and BJP will have an alliance for Lok Sabha elections which will be a mega and winning alliance pic.twitter.com/WeEADmnzR6
— ANI (@ANI) February 19, 2019
एआयएडीएमके आणि भाजपा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आघाडी मोठी आणि विजयी ठरणारी असेल, अशा विश्वास तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी व्यक्त केला.
Tamil Nadu Deputy CM O Panneerselvam: AIADMK and BJP will have an alliance for Lok Sabha elections which will be a mega and winning alliance pic.twitter.com/WeEADmnzR6
— ANI (@ANI) February 19, 2019
तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या 21 जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपा एआयएडीएमकेला पाठिंबा देणार आहे. राज्यामध्ये ओ. पनीरसेल्वम आणि ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत. तर केंद्रामध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढू, असे भाजपा नेते पीयुष गोयल यांनी सांगितले.
Piyush Goyal, BJP: We will support AIADMK in the by-elections on 21 assembly seats in Tamil Nadu. We have agreed to contest elections in the leadership of OPS & EPS in state & in leadership of Modi Ji in center pic.twitter.com/2nUZAPHiaM
— ANI (@ANI) February 19, 2019