Tamil Nadu Assembly Election 2021: मोदीजी, प्रचाराला या, आमचं मताधिक्य वाढेल; विरोधी उमेदवारांचं पंतप्रधानांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 06:16 AM2021-04-04T06:16:30+5:302021-04-04T06:54:49+5:30

Tamil Nadu Assembly Election 2021: द्रमुक उमेदवारांचे मोदींना आव्हान; उपहासात्मक आव्हानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Tamil Nadu Assembly Election 2021 DMK candidates taunt PM Modi invite him to their constituencies | Tamil Nadu Assembly Election 2021: मोदीजी, प्रचाराला या, आमचं मताधिक्य वाढेल; विरोधी उमेदवारांचं पंतप्रधानांना थेट आव्हान

Tamil Nadu Assembly Election 2021: मोदीजी, प्रचाराला या, आमचं मताधिक्य वाढेल; विरोधी उमेदवारांचं पंतप्रधानांना थेट आव्हान

Next

चेन्नई : तमिळनाडूमध्ये द्रमूक आणि अण्णाद्रमुक पक्षांमध्ये खरी लढत असली तरी पंतप्रधान मोदी यांना विरोधात प्रचारसभा घेण्याचे आव्हान द्रमुक उमेदवारांकडून दिले जात आहे. उपहासात्मक पद्धतीने दिलेल्या या आव्हानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी भाजप किंवा अण्णाद्रमुकच्या उमेदवारांचा प्रचार करावा, जेणेकरून आमच्या मताधिक्यात वाढ होईल, असा टोमणा पंतप्रधानांना ट्विटरवर टॅग करून काही उमेदवारांनी मारला आहे.

कुमबुम विधानसभा मतदारसंघातील द्रमुकचे उमेदवार एन. रामकृष्णा ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून तुम्ही कुम्बुम विधानसभेत प्रचार करा, मी येथे द्रमुकचा उमेदवार आहे. तुमच्या प्रचारामुळे माझे मताधिक्य वाढण्यास मदत होईल, असे आव्हान त्यांनी दिले आहे. पंतप्रधानांना आपल्या विरोधात प्रचार करण्याचे खुले आव्हान देऊन एन. रामकृष्णा यांनी सोशल मीडियावर खळबळ माजवून दिली आहे. त्यांच्या या हटके स्टाईलनंतर द्रमुक नेत्यांनी देखील असे टि्वट केले आहेत. पाच टर्म आमदार असलेल्या ई.व्ही. वेलू यांनी थिरूवन्नमलाई मतदारसंघात आपल्या विरोधकाचा प्रचार करण्याचे आव्हान मोदी यांना दिले. वेलू यांच्यासाठी घरावर आयकर विभागाने छापे मारले होते. सेव्वाराज के. थडंगम पी सुब्रमणी, अनिथा राधाकृष्णन, अंबेथकुमार या द्रमुक नेत्यांनी देखील टि्वटरवर असे आव्हान दिले आहे.

पंतप्रधानांविरोधात नाराजी
तमिळनाडूमध्ये सध्या पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी दिसते. जल्लीकट्टू, नीट, तमिळी अस्मिता, हिंदीचे उद्दातीकरण अशा प्रकरणामुळे तमिळी जनतेत केंद्र सरकारबाबत नाराजी आहे. 
तमिळी, द्रविडी परंपरावर भाजप आक्रमण करत असल्याचा आरोप द्रमुक करत आहे. राज्यातील अण्णाद्रमुक हे केंद्र सरकारच्या हातातील बाहुले असून, त्यांच्या माध्यमातून केंद्र आपली मर्जी चालवत असल्याचे द्रमुक मतदारांना सांगत आहे. 
यातून पंतप्रधानांनी आपल्याविरोधात प्रचार केल्यास त्याचा आपल्याला फायदा होईल, असे द्रमुक नेत्यांना वाटते.

Web Title: Tamil Nadu Assembly Election 2021 DMK candidates taunt PM Modi invite him to their constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.