'DMKचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एम्समधून विट चोरली', भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 07:04 PM2021-03-27T19:04:08+5:302021-03-27T19:05:30+5:30
tamil nadu assembly elections : गेल्या काही दिवसांपूर्वी मदुराईमध्ये उदयनिधी यांनी एक रॅली आयोजित केली होती. या रॅलीतील त्यांनी एक विट हातात घेतली होती.
tamil nadu assembly elections :
चेन्नई : तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. यातच भाजपाच्या एका कार्यकर्त्यांने द्रमुक (DMK)पार्टीच्या युवा विंगचे नेते उदयनिधी स्टॅलिन (udhayanidhi stalin) यांच्यावर विट चोरी करण्याचा आरोप केला आहे. तसेच, याप्रकरणी या भाजपा कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये उदयनिधी यांनी एम्स मदुराईमधून विट चोरी केली होती, असे म्हटले आहे. (tamil nadu assembly elections : bjp worker files complaint against udhayanidhi stalin for stealing brick from aiims in madurai)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मदुराईमध्ये उदयनिधी यांनी एक रॅली आयोजित केली होती. या रॅलीतील त्यांनी एक विट हातात घेतली होती. त्या विटेवर एम्स (AIIMS) असे लिहिले होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्याने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये उदयनिधी यांच्याविरोधात विट चोरी केल्याची तक्रार दाखल केली आहे.
எய்ம்ஸ் நாங்கள் கட்டவில்லை என காவல் நிலையத்தில் ஒப்புதல் வாக்குமூலம் கொடுத்த மோடியோட சங்கீ @BJP4TamilNadu@AIADMKITWINGOFL@vijaytelevision@arivalayam@dmk_youthwing@INCTamilNadupic.twitter.com/RoHOwonPxG
— (@Illamaran21) March 26, 2021
२०१९ मध्ये केंद्र सरकारने देशात १२ एम्स तयार करण्याची घोषणा केली होती. यामध्ये एक एम्स मदुराईमध्ये तयार करण्यात येणार आहे. बाकी ११ एम्ससाठी निधी जारी करण्यात आला आहे. मात्र, मदुराई एम्ससाठी फंड जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीमार्फंत कर्जाच्या स्वरूपात मिळत आहे. एम्सच्या निर्मितीसाठी होत असलेल्या विलंबामुळे द्रमुक नेता उदयनिधी स्टॅलिन यांनी विटेद्वारे केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
उदयनिधी यांनी ही विट एका रॅलीत आणली आणि म्हणाले, 'तुम्ही या विटेला एम्स म्हणू शकता, कारण सरकार आपले वचन कधीच पूर्ण करणार नाही.' दरम्यान, उदयनिधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, "250 एकर जागेसाठी विटा आल्या आहेत. त्यापैकी एक मी आणली आहे. गेल्या तीन वर्षांपासून भाजपा आणि अण्णाद्रमुक सरकार एम्सच्या बांधकामासाठी काय करीत आहे?" असा सवाल उदयनिधी यांनी केला आहे.
तामिळनाडूमध्ये ६ एप्रिलला मतदान
तामिळनाडूमध्ये २३४ विधानसभेच्या जागांसाठी ६ एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २०१६ मध्ये १३४ जागा जिंकून अण्णाद्रमुक म्हणजेच AIADMK ने सरकार स्थापन केले होते. तर डीएकेला ९४ जागा मिळाल्या होत्या.