मोबाइलवर गेम खेळाणाऱ्यांना बसणार मोठा झटका! बंद होणार कमाईची सर्व मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 04:36 PM2022-09-28T16:36:00+5:302022-09-28T16:38:22+5:30

सध्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  यात सट्टेबाजीवाले गेम्सही आहेत. यातून अनेकजण पैसाही मिळवतात. मात्र आता मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना झटका बसणार आहे.

Tamil Nadu Cabinet has approved an ordinance to ban online gambling | मोबाइलवर गेम खेळाणाऱ्यांना बसणार मोठा झटका! बंद होणार कमाईची सर्व मार्ग

मोबाइलवर गेम खेळाणाऱ्यांना बसणार मोठा झटका! बंद होणार कमाईची सर्व मार्ग

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या मोबाइलवर ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  यात सट्टेबाजीवाले गेम्सही आहेत. यातून अनेकजण पैसाही मिळवतात. मात्र आता मोबाइलवरऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना झटका बसणार आहे. तामिळनाडू मंत्रिमंडळाने ऑनलाइन जुगार खेळावर बंदी घालण्यासाठी अध्यादेश मंजूर केला आहे. आता या अध्यादेशावर राज्यपाल यांची स्वाक्षरी होणार असून त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे.  

तामिळनाडू सरकारने हा अध्यादेश एका निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून तयार केला आहे. हा अध्यादेश एका अहवालावरुन बनवण्यात आला आहे. हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश के चंद्रू यांनी जून २०२२ मध्ये एक अहवाल सरकारकडे सादर केला होता.या अहवालात त्यांनी देशाच्या तरुण पीढीवर गेम्सचा वाईट परिणाम होईल असं म्हटले आहे. 

Passport Apply : पोस्‍ट ऑफिसद्वारे झटपट बनवता येणार पासपोर्ट! जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...

त्यांनी ७१ पानांचा अहवाल सादर केला होता, यानंतर ऑनलाइन जुगार गेम्सवर बंदी घालण्याची सूचना सरकारला केली होती. सरकारने त्यांच्या सूचनेचा विचार केला आणि त्यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करून, ऑनलाइन गेमचा आपल्या समाजावर किती वाईट परिणाम होतो आणि होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी विविध स्तरांवर सर्वेक्षणही केले. 

तामिळनाडू सरकारने यासाठी शिक्षण विभागाला ई-मेलद्वारे सर्वेक्षण करून त्याची सर्व माहिती गोळा केली. दरम्यान, याशिवाय अजुनही वेगळ्या गेम्स आहेत, यावर सरकार बंदी घालू शकते. 'या गेमींग अॅप्समुळे देशातील तरुण आत्महत्या केल्याचे या अहवालातून समोर आले आहे. या गेम्स खेळण्याच्या सवयी तरुणांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्यांचे पालक कर्जात बुडत आहेत.

'भाजपाध्यक्ष नड्डांचा दावा खोटा, एम्स रुग्णालयाची एक वीटही उभारली नाही'

तामिळनाडू सरकारने दुसऱ्यांदा ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याचा प्रय़त्न केला आहे. याअगोदरही ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्यासंदर्भात अर्ज केला होता, पण मद्रास हायकोर्टाने हा अर्ज फेटाळला होता.  

Web Title: Tamil Nadu Cabinet has approved an ordinance to ban online gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.