विक्रमासाठी तामिळनाडूचा उमेदवार बीडच्या रिंगणात
By admin | Published: September 24, 2014 04:31 AM2014-09-24T04:31:30+5:302014-09-24T04:31:30+5:30
निवडणुकीच्या आखाड्यात उतरणारा प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मते खेचून जिंकण्याचा प्रयत्न करीत असतो.
व्यंकटेश वैष्णव, बीड
निवडणुकीच्या आखाड्यात उतरणारा प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मते खेचून जिंकण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र एक उमेदवार असा आहे, जो जिंकण्यासाठी नव्हे तर पराभूत होण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरतो. आजवर त्याने विविध ६५ निवडणुकांत पराभवाचा धुराळा अंगावर घेतला आहे. आता थेट तामिळनाडू राज्यातून हे महाशय बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत... पण जिंकण्यासाठी नव्हे तर पराभूत होण्यासाठी.
डॉ. के. पद्मराजन यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावाकडे म्हणजेच तामिळनाडूमधील मेट्टर येथे त्यांचे टायर पंक्चर काढण्याचे दुकान आहे. त्यांनी राष्ट्रपती पदापासून नगर पंचायतीपर्यंतच्या जवळपास ६५ निवडणुका लढविल्या आहेत. यासाठी त्यांनी १५ लाख रुपये खर्च केले आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्यानंतर बडोदा लोकसभा मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक देखील के. पद्मराजन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.