तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:27 PM2020-06-16T14:27:55+5:302020-06-16T15:13:36+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

Tamil Nadu government decides to provide financial assistance to 13.35 lakh people | तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

Next
ठळक मुद्देकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तामिळनाडू सरकारने 19 जून ते 30 जून या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा केली आहे.

चेन्नई : तामिळनाडू सरकारने कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तामिळनाडू राज्य सरकारने 13.35 लाख लोकांना वेगवेगळ्या कार्डधारकांच्या आधारे एक-एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा सामना सध्या संपूर्ण देशाला करावा लागत आहे. देशात कोरोनाची लागण 3 लाखाहून अधिक लोकांना झाली आहे, तर मृत्यूची संख्या 9 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अद्याप कोणतेही प्रभावी औषध मिळाले नाही. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तामिळनाडू सरकारने 19 जून ते 30 जून या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा केली आहे. चेन्नई, तिरुवेलूर, कांचीपुरम, जिंगलपेठ या भागात कडक लॉकडाऊन असेल. यामध्ये रिक्षा, बस सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. सरकारी कार्यालयात फक्त 33 टक्के हजेरी असेल, तर अत्यावश्यक सेवांची दुकान सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत सुरू राहणार आहेत.

तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 46 हजारांच्या पुढे गेला आहे, तर मृतांचा आकडा 479 वर पोहोचला आहे. दुसरीकडे, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे, तर मृत्यू झालेल्यांची संख्या 9 हजारांवर पोहोचली आहे. कोरोनावर अद्याप कोणताही इलाज नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारी घेण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. देशात सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे.

कोरोना व्हायरचा फटका फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला बसला आहे. जागतिक स्तरावर कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 80 लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत एक लाख 12 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर 21 लाखांहून अधिका लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्राझील, रशिया, ब्रिटेन, भारत, इटली आणि स्पेन या देशांमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

आणखी बातम्या...

मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार

"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

Web Title: Tamil Nadu government decides to provide financial assistance to 13.35 lakh people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.