'निवार'नंतर तामिळनाडूला दुसरे चक्रीवादळ शुक्रवारी धडकण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 07:38 AM2020-12-01T07:38:48+5:302020-12-01T07:38:59+5:30

या दुसऱ्या चक्रीवादळामुळे तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

Tamil Nadu is likely to be hit by another cyclone on Friday after Niwar; Weather account forecast | 'निवार'नंतर तामिळनाडूला दुसरे चक्रीवादळ शुक्रवारी धडकण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

'निवार'नंतर तामिळनाडूला दुसरे चक्रीवादळ शुक्रवारी धडकण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Next

चेन्नई : तामिळनाडूला निवार चक्रीवादळ धडकून आठवडा पूर्ण होण्याच्या आतच आता दुसऱ्या चक्रीवादळाचा या राज्याला शुक्रवारी, २ डिसेंबर रोजी तडाखा बसण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

या दुसऱ्या चक्रीवादळामुळे तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या खात्याने सदर दोन राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हे दुसरे चक्रीवादळ घोंघावणार आहे. त्यावेळी ताशी ७५ ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
दुसऱ्या चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे तामिळनाडू, केरळमधील मच्छीमारांनी शुक्रवारी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात २६ नोव्हेंबरला निवार हे चक्रीवादळ तामिळनाडू, पुडुचेरीला धडकले होते. त्यामुळे तेथील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला व पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, निवार चक्रीवादळामुळे सुदैवाने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली नाही.

Web Title: Tamil Nadu is likely to be hit by another cyclone on Friday after Niwar; Weather account forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान