तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल 2019: करुणानिधींची कन्या करेल का करिष्मा?; कनिमोळींकडून द्रमुकला आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:58 AM2019-05-23T10:58:29+5:302019-05-23T11:00:09+5:30

Tamil Nadu Lok Sabha Election 2019 Result : थूथुकोडी मतदार संघातून कनिमोळी आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार तमिलिसाई सौंदराजन मैदानात आहेत. 

Tamil Nadu Lok Sabha election result 2019: Karunanidhi's daughter will do magic?; Kanimozhi's DMK hope | तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल 2019: करुणानिधींची कन्या करेल का करिष्मा?; कनिमोळींकडून द्रमुकला आशा

तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल 2019: करुणानिधींची कन्या करेल का करिष्मा?; कनिमोळींकडून द्रमुकला आशा

Next

चेन्नई :  द्रविड मुन्नेत्र कळगम (डीएमके)चे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांची कन्या कनिमोळी तामिळनाडूतील थूथुकोडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. थूथुकोडीला तामिळनाडूचे समुद्री द्वार म्हटले जाते. याठिकाणी 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक झाली. मात्र 9 वर्षांत थूथुकोडीमध्ये राजकीय संघर्ष डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात झाल्याचे पाहायला मिळते. 

गेल्या निवडणुकीत एआयएडीएमकेचे उमेदवार जे. टी. नटराजन यांनी डीएमकेचे के.पी जगन यांचा पराभव केला होता. जे. टी. नटराजन यांनी 1 लाख 24 हजार 002 मतांनी विजय मिळविला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत थूथुकोडी मतदार संघातून कनिमोळी आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार तमिलिसाई सौंदराजन मैदानात आहेत. 

थूथुकोडी मतदार संघासाठी गेल्या 18 एप्रिल रोजी मतदान झाले होते. मात्र मतदानाच्या दोन दिवसआधी कनिमोळी यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले होते. थूथुकोडीला 'मुथु कुजिथुरई' नावाने सुद्धा ओळखले जाते. थूथुकोडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेच्या जागा आहेत. तसेच, येथील एट्टापुरम, काझुगुमलाई, पनिमया माथा चर्च , अदिचनुल्लुर, कायथर, कोरकाई ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत.
 

Web Title: Tamil Nadu Lok Sabha election result 2019: Karunanidhi's daughter will do magic?; Kanimozhi's DMK hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.