मंदिरात चोरीचा संशय; 20 किमी पाठलाग करत जमावाचा कुटुंबावर हल्ला, 10 वर्षीय मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:25 PM2022-11-17T17:25:13+5:302022-11-17T17:25:21+5:30

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tamil Nadu: Mob lynching of family in Pudukkottai , 10 year old girl died | मंदिरात चोरीचा संशय; 20 किमी पाठलाग करत जमावाचा कुटुंबावर हल्ला, 10 वर्षीय मुलीचा मृत्यू

मंदिरात चोरीचा संशय; 20 किमी पाठलाग करत जमावाचा कुटुंबावर हल्ला, 10 वर्षीय मुलीचा मृत्यू

googlenewsNext

पुदुकोट्टई:तामिळनाडूतील पुदुकोट्टई गावात मंदिरात चोरीच्या संशयावरून एका कुटुंबावर जमावाने हल्ला केला. ऑटोतून जात असलेल्या या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात करपगंबिका नावाच्या 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. घटना 14 नोव्हेंबरची आहे, मात्र त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हिडिओमध्ये जमाव कुटुंबातील सहा सदस्यांवर हल्ला करताना दिसत आहे. कुटुंबासोबतच 10 वर्षीय करपगंबिका हिलाही दुखापत झाली आहे. जखमींना पुदुकोट्टई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी कर्पागंबिकाचे निधन झाले. या कुटुंबाकडून मंदिरातील साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

जमावाने कुटुंबाचा 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला
सविस्तर माहिती अशी की, तामिळनाडूच्या पुदुकोट्टई जिल्ह्यातील किलनूर टाउनशिपजवळ एक गट धार्मिक स्थळांना लुटत असल्याची बातमी पसरली. व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून गर्दी जमवली. यानंतर ऑटोमध्ये बसून गावाबाहेर पडलेल्या लोकांना चोर समजून गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. 20 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर लोकांनी ऑटो थांबवला. यानंतर आत बसलेल्या लोकांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, मात्र तोपर्यंत पोलिस पोहोचले.

मुलीची आई म्हणाली - ते मंदिरात दर्शनासाठी गेले होते
याप्रकरणी मुलीची आई लिली पुष्पा यांनी गणेश नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने सांगितले की, त्यांचे कुटुंब दोन महिन्यांपूर्वी अनेक मंदिरांना भेट देण्यासाठी ऑटोरिक्षाने कुड्डालोरहून निघाले होते. 14 नोव्हेंबर रोजी किलनूरजवळ त्याचे तीन जणांशी भांडण झाले, यानंतर जमावाने हल्ला केला. दरम्यान, पोलिसांनी या कुटुंबाकडून घंटा आणि इतर पितळी साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Tamil Nadu: Mob lynching of family in Pudukkottai , 10 year old girl died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.