मुलांच्या फीसाठी आईने उचलले टोकाचे पाऊल, धावत्या बससमोर मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:18 PM2023-07-18T20:18:42+5:302023-07-18T20:22:04+5:30
तमिळनाडूतील सालेममध्ये घडलेल्या या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला.
चेन्नई-तामिळनाडूतील सेलममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने धावत्या बससमोर उडी मारुन आपले जीवन संपवले. मुलांच्या फीसाठी महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.
नेमकं काय कारण?
आपल्या मृत्यूनंतर मुलांना सरकारकडून मिळालेल्या नुकसान भरपाईच्या पैशातून मुलांच्या कॉलेजची फी भरता येईल, अशी आशा मनात धरुन महिलेने स्वतःचे जीवन संपले. पप्पाथी(39) अशी या महिलेचे नाव असून, ती सालेम जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत होती.
A woman in Salem, TN commited suicide by coming in front of a moving bus on 28th June.
— NK (@nirmal_indian) July 18, 2023
Now after investigations, it's found that she did it intentionally to get money for her son's education!
She heard somewhere that if someone dies in an accident, govt pays money to their kin! pic.twitter.com/t1lnVb0Ofo
cctv मध्ये घटना कैद
घटनेचा 48 सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, यात महिला रस्त्याच्या कडेला चालताना दिसत आहे. रस्त्याने चालत असताना ती महिला अचानक धावत्या बससमोर उडी घेते. बसचा जोरदार धक्का लागल्यानंतर महिला रस्त्यावर पडते. बहुधा यातच तिचा मृत्यू झाला असावा.
महिलेची दिशाभूल केली
ही महिला दोन मुलांची सिंगल पॅरेंट असल्याची माहिती मिळाली आहे. तिची मुलगी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे तर मुलगा पॉलिटेक्निकमध्ये आर्किटेक्चर शिकत आहे. पोलिसांनी माहिती दिली की, महिला गरीब असून, कोणीतरी तिची दिशाभूल केली. तिला सांगितले की, अपघातात मृत्यू झाल्यावर मोठी नुकसान भरपाई मिळते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.