"'HINDIA' बनवण्याचा प्रयत्न करतायत...!' भाषा वादावरून कमल हासन यांचा भाजपवर थेट निशाणा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:22 IST2025-03-05T18:20:12+5:302025-03-05T18:22:30+5:30
नव्या शिक्षण धोरणांतर्गत तीन भाषीय फॉर्मूल्यासंदर्भात बोलताना कमल म्हणाले, "ते हिंदिया बनवत आहेत. केंद्राकडून घेण्यात येणारा कुठलाही निर्णय बिगर हिंदी भाषिक राज्यांच्या बाजूने असणार नाही. हा निर्णय संघराज्याच्या तत्वांविरुद्ध आहे आणि अनावश्यक आहे.

"'HINDIA' बनवण्याचा प्रयत्न करतायत...!' भाषा वादावरून कमल हासन यांचा भाजपवर थेट निशाणा, म्हणाले...
सध्या भाषेच्या मुद्द्यावरून तामिळनाडूतील राजकारण शिगेला पोहोचले आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप तामिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांवर हिंदी लादत असल्याचा आरोप अभिनेता कमल हासन यांनी केला आहे. याशिवाय, त्यांनी मतदारसंघांच्या पुरनर्रचनेवरही भाष्य केले. तसेच, केंद्र सरकारवर हल्ला चढवत, ते 'हिंदिया' (HINDIA) करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कमल हसन यांनी केला आहे.
मक्कल निधी मैयमचे (एमएनएम) अध्यक्ष कमल हासन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, अशा प्रकराचा कुठलाही निर्णय बिगर हिंदी भाषिक राज्यांसाठी हिताचा नाही. नव्या शिक्षण धोरणांतर्गत तीन भाषीय फॉर्मूल्यासंदर्भात बोलताना कमल म्हणाले, "ते हिंदिया बनवत आहेत. केंद्राकडून घेण्यात येणारा कुठलाही निर्णय बिगर हिंदी भाषिक राज्यांच्या बाजूने असणार नाही. हा निर्णय संघराज्याच्या तत्वांविरुद्ध आहे आणि अनावश्यक आहे.
मतदारंसघाच्या पुनर्रचनेसंदर्भात काय म्हणाले कमल हासन? -
प्रस्तावित सीमांकनासंदर्भात (मतदारंसघाच्या पुनर्रचनेसंदर्भात) बोलताना हसन म्हणाले, लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या बदलण्याची गरज नाही. ते न तुटलेल्य वस्तूची दुरुस्त कशासाठी करत आहेत? ते लोकशाहीला दुरुस्तीसाठी कार्यशाळेत का पाठवत आहेत?"
खरे तर, तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या द्रमुकला लोकसंख्येच्या आधारावर सीमांकनामुळे राज्यांचे संसदेतील संख्याबळ कमी होईल, त्यांच्या जागा कमी होतील, अशी चिंता सतावत आहे.