कामाच्या तणावाचा आणखी एक बळी; सॉफ्टवेअर इंजिनिअरने विजेच्या धक्क्याने स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 11:15 AM2024-09-21T11:15:32+5:302024-09-21T11:23:34+5:30

तमिळनाडूमध्ये कामाच्या तणावाखाली असलेल्या एका अभियंत्याने स्वतःला अत्यंत भयानक पद्धतीने स्वतःला संपवले.

Tamil nadu Software engineer kills her self at apartment | कामाच्या तणावाचा आणखी एक बळी; सॉफ्टवेअर इंजिनिअरने विजेच्या धक्क्याने स्वतःला संपवलं

कामाच्या तणावाचा आणखी एक बळी; सॉफ्टवेअर इंजिनिअरने विजेच्या धक्क्याने स्वतःला संपवलं

Shocking News तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये कामाच्या तणावाखाली एका सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वतःला भयानकपणे संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या महाबलीपुरम रोड जवळील थजंबूर येथे एका सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वत:ला विजेचा धक्का देऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरातून घरी परतलेल्या पत्नीला तो बेशुद्धावस्थेत आणि त्याच्याभोवती तार गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला.

कार्तिकेयन (३८) असं मृत अभियंत्याचे नाव असून तो मूळचा थेनीचा रहिवासी आहे. कार्तिकेयन हा पल्लवरम येथील एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये गेल्या १५ वर्षांपासून नोकरीला होता. कार्तिकेयन हा त्याची पत्नी के जयराणी आणि त्यांच्या १० आणि ८ वर्षांच्या दोन मुलांसोबत राहत होता. कामाच्या दबावामुळे त्याने नैराश्याची तक्रार त्याने केली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्यावर मेडावक्कम येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोमवारी जयराणी बचतगटातील तिच्या मैत्रिणींसोबत थिरुनल्लारू मंदिरात गेली होती. कार्तिकेयनला घरी एकटे सोडून तिने आपल्या मुलांना आईकडे ठेवले होते. गुरुवारी रात्री ती परत आली असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. वारंवार दरवाजा ठोकूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने दुसरी चावी वापरली आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघताच जयराणीला धक्का बसला. घरात कार्तिकेयन बेशुद्ध पडलेला होता.

कार्तिकेयनने केवळ अंतर्वस्त्र घातले होते आणि हॉलमधील मुख्य जंक्शन बॉक्सला जोडलेल्या पॉवर केबलने त्याचे संपूर्ण शरीर गुंडाळले होते. हे पाहून घाबरलेल्या जयराणीने शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ थाळंबूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी कार्तिकेयनचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी क्रोमपेट सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून कार्तिकेयनने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरु केला आहे.

कामाच्या ताणामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू

पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या २६ वर्षीय सीए अॅना सेबॅस्टियन पिरेयिल हिचा अतिकामामुळे आणि तणावामुळे बळी गेला. नोकरीला लागल्यानंतर अवघ्या चार महिन्यात अॅनाचा मृत्यू झाला. अॅना कामावर रूजू झाल्यापासून प्रंचड तणावाखाली होती. तिच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी कंपनीच्या भारतीय प्रमुखांना पत्र लिहित गंभीर आरोप केले होते. या घटनेची मोदी सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
 

Web Title: Tamil nadu Software engineer kills her self at apartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.