मुलाचे धक्कादायक कृत्य, सिनेमासाठी पैसे दिले नाहीत म्हणून वडिलांना पेटविले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 02:51 PM2019-01-11T14:51:38+5:302019-01-11T14:56:48+5:30

सिनेमाच्या तिकीटासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने स्वत:च्या वडिलांना पेटविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. तामिळनाडूमधील वेल्लोरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मुलगा अजिथ कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tamil Nadu teen sets father ablaze for refusing film ticket money | मुलाचे धक्कादायक कृत्य, सिनेमासाठी पैसे दिले नाहीत म्हणून वडिलांना पेटविले

मुलाचे धक्कादायक कृत्य, सिनेमासाठी पैसे दिले नाहीत म्हणून वडिलांना पेटविले

Next

वेल्लोर : सिनेमाच्या तिकीटासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने स्वत:च्या वडिलांना पेटविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. तामिळनाडूमधील वेल्लोरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मुलगा अजिथ कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिथ कुमार याचे  45 वर्षीय वडील पांडियन हे  वेल्लोरमध्ये रोजंदारीवर काम करतात. पत्नीशी भांडण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते घराबाहेर रस्त्याच्या कडेला राहत होते. गुरुवारी सकाळी पांडियन येथील एका बंद दुकानासमोर झोपले होते. त्यावेळी अजिथ कुमारने त्यांना उठवले आणि सांगितले की, 'विश्वासम' हा चित्रपट पाहण्यासाठी जायचे आहे. यासाठी पैसे द्या. मात्र, पांडियन यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाने अजिथ कुमार याने घरातून रॉकेलची बाटली आणली. त्यानंतर पांडियन यांच्या अंगावर रॉकेल ओतले आणि आग लावून पळ काढला. 

पांडियन आगीमुळे मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या मजुरांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर मजुरांनी पांडियन यांना वेल्लोरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केले. सध्या पांडियन यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर, अजिथ कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी करत आहेत. 

Web Title: Tamil Nadu teen sets father ablaze for refusing film ticket money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.