...तर हिंदी भाषेविरुद्ध पेटून उठेल तामिळनाडू

By admin | Published: March 31, 2017 04:22 PM2017-03-31T16:22:03+5:302017-03-31T16:40:24+5:30

वेल्लोर, क्रिष्णागिरी जिल्ह्यातील महामार्गांवर इंग्रजी दिशादर्शक फलक हटवून त्याजागी हिंदी भाषेतील फलक बसवण्यात आले आहेत.

Tamil Nadu will be burnt against Hindi ... | ...तर हिंदी भाषेविरुद्ध पेटून उठेल तामिळनाडू

...तर हिंदी भाषेविरुद्ध पेटून उठेल तामिळनाडू

Next

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 31 - तामिळनाडूत महामार्गांवरील इंग्रजी भाषेतील मार्गदर्शक बोर्ड हटवून त्याजागी बसवण्यात आलेल्या हिंदी भाषेतील मागदर्शक बोर्डांवर द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम.के.स्टालिन यांनी आक्षेप घेतला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मागच्या दाराने तामिळनाडूत हिंदी भाषा आणण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्राने तामिळ भाषेकडे दुर्लक्ष करुन हिंदीला प्राधान्य दिले तर, तामिळनाडूत हिंदी विरोधात मोठे आंदोलन उभे करु असा इशारा स्टालिन यांनी दिला आहे. 
 
वेल्लोर, क्रिष्णागिरी जिल्ह्यातील महामार्गांवर इंग्रजी दिशादर्शक फलक हटवून त्याजागी हिंदी भाषेतील फलक बसवण्यात आले आहेत. त्यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली. स्टालिन तामिळनाडू विधानसभेचे विरोधीपक्षनेतेही आहेत. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकार संस्कृत आणि हिंदी भाषेला भरपूर महत्व देत आहे. 
 
केंद्राने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करु नये असे स्टालिन म्हणाले. 1960 च्या दशकात तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेविरोधात मोठे आंदोलन झाले होते त्यामुळे द्रविडीयन चळवळ अधिक भक्कम झाली. पहिल्यापासून तामिळनाडूत भाषिक अस्मितेचे राजकारण मोठया प्रमाणावर केले जाते. फक्त महामार्गावरील बोर्ड हिंदीमध्ये बदलण्याच्या मुद्यावरुन तामिळनाडूत सर्वपक्षीय राजकारणी एकवटत असल्याचे चित्र आहे. एमडीएमकेचे नेते वायको, पीएमकेचे नेते एस रामदॉस यांनी सुद्धा हिंदी भाषेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 
 

Web Title: Tamil Nadu will be burnt against Hindi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.