VIDEO : वॉटरफॉलमध्ये अचानक आला पूर, पाण्यात अडकलेल्या आई-मुलाला असं वाचवलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:03 PM2021-10-26T18:03:41+5:302021-10-26T18:14:21+5:30
Anaivari Waterfalls Rescue : अनायवरी वॉटरफॉल सलेम जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते.
तामिळनाडूच्या (Tamil Nadu) सालेम (Salem District) जिल्ह्यातील अनायवरी वॉटरफॉलमध्ये (Anaivari Waterfalls) एका महिला तिच्या लहान मुलासोबत अडकली होती. एकीकडे वेगाने वाहणारं पाणी आणि दुसरीकडे शेवाळ जमा झालेले मोठाले दगड होते. अशात आई आणि मुलाचं वाचणं अशक्य वाटत होतं.
तेव्हाच फॉरेस्टच्या स्टाफकडून आणि काही लोकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनतर वॉटरफॉलमध्ये अडकलेल्या महिलेला आणि तिच्या मुलाला सुखरूप बाहेर काढलं. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत बघू शकता की, रेस्क्यू ऑपरेशन किती खतरनाक होतं. आजूबाजूचे लोकही ओरडत होते.
असं सांगितलं जात आहे की, अनायवरी वॉटरफॉल सलेम जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. गेल्या रविवारी इथे लोक जमा झाले होते तेव्हा कलवरायण डोंगराजवळ मुसळधार पाऊस झाल्याने वॉटरफॉलची पाण्याची पातळी वाढली होती. हे अचानक झाल्याने अनेक लोकांना स्वत:ला सांभाळण्याची संधीच मिळाली नाही.
Brave effort by forest staff while saving life of a mother with infant at #Anaivari waterfalls in #Salem district of #TamilNadu#TNForesters
— Surender Mehra IFS (@surenmehra) October 26, 2021
Via:@Shilpa1308@supriyasahuias@SudhaRamenIFSpic.twitter.com/TN1maKbWsv
वॉटरफॉलची पाण्याची पातळी वाढली तेव्हा एक महिला आणि तिचा मुलगा एका खडकावर अडकले होते. या दगडांवर मोठ्या प्रमाणात शेवाळ होतं. त्यामुळे सहजासहजी त्यावर चढता येत नव्हतं. तेव्हा ती मदतीसाठी आवाज देऊ लागली होती. तेव्हाच दोन व्यक्तींनी हिंमत दाखवत आई-मुलाला वाचवलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून महिला आणि तिच्या मुलाला वाचवणाऱ्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे.