तामिळनाडूत चेन्नई - मंगळुरु एक्सप्रेसला अपघात, ३८ जखमी

By admin | Published: September 4, 2015 09:07 AM2015-09-04T09:07:50+5:302015-09-04T09:14:38+5:30

तामिळनाडूतील कुड्डलोर येथे चेन्नई मंंगळुरु एक्सप्रेसचे पाच डबे रेल्वे रुळांवरुन घसरले असून या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले आहेत.

Tamilnadu Chennai - Mangalore Express accident, 38 injured | तामिळनाडूत चेन्नई - मंगळुरु एक्सप्रेसला अपघात, ३८ जखमी

तामिळनाडूत चेन्नई - मंगळुरु एक्सप्रेसला अपघात, ३८ जखमी

Next

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. ४ - तामिळनाडूतील कुड्डलोर येथे चेन्नई मंंगळुरु एक्सप्रेसचे पाच डबे रेल्वे रुळांवरुन घसरले असून या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले आहे. या अपघातामुळे दक्षिण तामिळनाडूतून चेन्नईकडे जाणा-या रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

गुरुवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास पुवानूर येथे चेन्नई मंगळुरु एक्सप्रेसचे पाच डबे घसरले. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.  अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातात वाढ होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Web Title: Tamilnadu Chennai - Mangalore Express accident, 38 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.