धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची आत्महत्या; मृत्यूनंतर होतेय 'या' गोष्टीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 04:38 PM2020-07-21T16:38:07+5:302020-07-21T16:38:34+5:30

कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

tamilnadu doctor commit suicide in chennai government medical collage | धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची आत्महत्या; मृत्यूनंतर होतेय 'या' गोष्टीची चर्चा

धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची आत्महत्या; मृत्यूनंतर होतेय 'या' गोष्टीची चर्चा

Next

चेन्नई - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून अकरा लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

तामिळनाडूच्या चेन्नईमधील एका डॉक्टरनेआत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मेडिकल कॉलेज वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली. कोरोनाच्या या संकटात गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णांवर उपचार करत होता. डॉक्टरच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. यातूनच डॉक्टरने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या मृत्यूनंतर कामाचा अधिक ताण असल्याची चर्चा रंगली आहे. 

कन्नन असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव असून तो ऑर्थोपेडिक्स स्पेशालिस्ट होता. आत्महत्येच्या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चर्चा सुरू झाली आहे. कन्नन यांनी कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा ग्रुपवर सध्या सुरू आहे. मात्र पोलिसांनी असं काही नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून डॉक्टरने उडी मारून आत्महत्या केल्याचं चौकशीत स्पष्ट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कन्ननच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी कन्नन यांच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

महत्त्वाच्या बातम्या

...म्हणून दर 6 महिन्यांनी होणार आता सिमकार्ड व्हेरिफिकेशन, जाणून घ्या नवा नियम

Video - ... अन् मुलीसमोरच पत्रकारावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद 

CoronaVirus News : भारीच! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने कोरोनाला असं लावलं पळवून

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाग्रस्तांसाठी 'हे' औषध ठरतंय संजीवनी; 79 टक्के धोका झाला कमी

CoronaVirus News : अरे व्वा! कोविड सेंटरमध्येच रुग्णांनी केला भन्नाट डान्स, Video तुफान व्हायरल

CoronaVirus News : आजारी आईला पाहण्यासाठी 'तो' रुग्णालयाच्या इमारतीवर चढायचा अन्...; मन सुन्न करणारी घटना

धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ

 

 

Web Title: tamilnadu doctor commit suicide in chennai government medical collage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.