तामिळनाडूच्या कुडलोरमधील फटाका कारखान्यात स्फोट, सात जण ठार, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:21 PM2020-09-04T13:21:57+5:302020-09-04T13:22:04+5:30
स्थानिक प्रशासनाच्या मते मृतांची संख्या वाढू शकते. कुडलोरचे पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली.
तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यात फटाक्यांचा कारखान्यात स्फोट झाला. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मते मृतांची संख्या वाढू शकते. कुडलोरचे पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी शोधपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. कुडलोर जिल्ह्यातील कट्टुमनारकोली भागात एका कारखान्यात हा भीषण स्फोट झाला आहे. ही जागा राजधानी चेन्नईपासून 190 किमी अंतरावर असल्याचे सांगितले जाते.
Six dead and three injured in a fire at a firecrackers factory in Cuddalore, Tamil Nadu: Superintendent of Police, Cuddalore pic.twitter.com/SmOUuACELK
— ANI (@ANI) September 4, 2020
Tamil Nadu: Death toll rises to seven in Cuddalore fire incident, says SP M Sree Abhinav https://t.co/lGY1REwZplpic.twitter.com/WBgOOJVbbt
— ANI (@ANI) September 4, 2020