कमी दाबाच्या प˜्याने तामिळनाडूत पाऊस

By admin | Published: November 15, 2015 11:13 PM2015-11-15T23:13:52+5:302015-11-15T23:13:52+5:30

Tamilnadu rain with low pressure | कमी दाबाच्या प˜्याने तामिळनाडूत पाऊस

कमी दाबाच्या प˜्याने तामिळनाडूत पाऊस

Next
>पुणे : नैऋत्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र आता नैऋत्य बंगालचा उपसागर व श्रीलंकेच्या लगतच्या मागावर आहे़ त्यामुळे तामिळनाडू व पाँडेचरी येथे मुसळधार पाऊस पडत आहे़ संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते़ नाशिक येथे राज्यातील सर्वात कमाल तापमान १३़४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प˜्याने गेल्या तीन दिवसांपासून दक्षिणेत पाऊस पडत आहे़ चिन्नई, पाँडेचरी, तिरुपती, तिरुअनंतपुरम, वेल्ल्होर, धर्मपूरी, नागाप˜णम तसेच दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला़ येत्या २४ तासात तामिळनाडू व पाँडेचरीला मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़
राज्यात पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहिल़ १८ व १९ नोव्हेंबरला दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़
१८ व १९ नोव्हेंबरला पुणे शहर व परिसरातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे़

Web Title: Tamilnadu rain with low pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.