CoronaVirus News : भयावह! कोरोनापासून वाचण्यासाठी 'त्याने' केला भयंकर उपाय; खाल्ला कच्चा विषारी साप अन्
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 07:40 PM2021-05-28T19:40:05+5:302021-05-28T19:48:35+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क विषारी साप चावून खाल्ल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,75,55,457 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,86,364 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,660 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,18,895 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक अफवा देखील पसरवल्या जात आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना घडली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने एक विचित्रच प्रकार केला आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क विषारी साप चावून खाल्ल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील पेरुमलपट्टीच्या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. साप खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसपासून आपला बचाव होणार असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. वाडिवेल असं या व्यक्तीचं नाव असून तो पेरुमलपट्टीचा रहिवासी आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. साप खाण्याऱ्या या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे.
CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोना नियमांचं उल्लंघन करत रुग्णाचा मृतदेह गाडीत टाकून नातेवाईक पसार #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/f1R5LfRebq
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021
वाडिवेल याने शेतात एक साप पकडला, त्याला मारलं आणि कोरोनावरील उपचार असल्याचं सांगत तो कच्चा खाल्ला. त्यावेळी त्याच्या मित्राने त्याचा साप खातानाचा एक व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. कोरोनाबाबत व्हिडीओच्या माध्यमातून असा विचित्र सल्ला देणं त्याला आता चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.वडीपट्टीमध्ये गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला 7,500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : बापरे! जीभ इतकी सुजली की रुग्णाला खाणं-पिणं आणि बोलणंही अशक्य#coronavirus#CoronaSecondWave#CoronavirusPandemic#CoronaVirusUpdateshttps://t.co/sUtpPu8NjK
— Lokmat (@MiLOKMAT) May 27, 2021
भयंकर! कोरोनाचा नवा साईड इफेक्ट; आकार वाढून तोंडाबाहेर लटकतेय रुग्णाची जीभ
कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णाच्या शरीरात काही साईड इफेक्ट्स हे पाहायला मिळत आहेत. यामध्ये आता जीभेला सूज येत असल्याचं समोर आलं आहे. फ्लोरिडा येथे राहणाऱ्या अँथोनी यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांनी कोरोनावर मात देखील केली पण त्यानंतरही त्यांच्या जीभेला सूज आली. ती सूज एवढी वाढली की जीभ बाहेर लटकायला लागली. जीभेला सूज येण्याच्या समस्येला Macroglossia असं म्हणतात. यामध्ये जीभेला सूज येते आणि तिचा आकार देखील वाढू लागतो. कोरोनावर रिसर्च करणारे डॉ. जेम्स मेलविल्ले यांनी आतापर्यंत त्यांच्याकडे याच्या 9 केसेस आल्याचं म्हटलं आहे. डॉ. जेम्स मेलविल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँथोनी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारानंतर त्याची जीभ इतकी सुजली की त्याला खाणं-पिणं आणि बोलणंही शक्य होत नाही. तसेच ती बाहेर आली आहे. ड़ॉक्टरांनी सर्जरी करून ती नॉर्मल साईज एवढी केली आहे.
अंत्यसंस्कारासाठी गावातलं कोणीही पुढे आलं नाही... शेवटी मुलीनेच पीपीई किट घालून केलं सगळं पण त्यानंतर श्राद्धाला तब्बल 150 जण हजर #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/5qJ9Tt3wXh
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021
"मास्क लावला नाही म्हणून पोलीस आले आणि मुलाला घेऊन गेले...त्याच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकले"#CoronavirusIndia#coronavirus#mask#Policehttps://t.co/OvlF4Ty4OQ
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021