तामिळनाडूबाबतचा अंदाज खोटा ठरला!

By admin | Published: May 20, 2016 09:05 AM2016-05-20T09:05:11+5:302016-05-20T09:15:49+5:30

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी विविध वृत्त वाहिन्या आणि संस्थांच्या एक्झिट पोलचे पितळ उघडे पाडले.

Tamilnadu's guess is false! | तामिळनाडूबाबतचा अंदाज खोटा ठरला!

तामिळनाडूबाबतचा अंदाज खोटा ठरला!

Next
>प्रमोद गवळी ल्ल नवी दिल्ली
चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी विविध वृत्त वाहिन्या आणि संस्थांच्या एक्झिट पोलचे पितळ उघडे पाडले आहे. तामिळनाडू वगळता अन्य सर्व राज्यांमध्ये या सर्वाचे अंदाज थोडेफार अचूक ठरले. परंतु जागांच्या बाबतीत मात्र ठराविक अंदाजच वास्तवाच्या जवळपास पोहोचू शकले आहेत. सी व्होटर-टाइम नाऊचा अंदाज सपशेल चुकला. उर्वरित निकाल फिफ्टी-फिफ्टी राहिला. जयललिता दुस:यांदा सत्तेत परत येतील, असे कोणीही म्हटले नव्हते. परंतु त्या दुस:यांदा सत्तेत परतल्या. 
बंगालबाबत अचूक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 21क् जागांवर विजय मिळण्याची शक्यता चाणक्य-न्यूज एक्सने व्यक्त केली होती. हा अंदाज जवळपास खरा ठरला.  आसामबाबत सी व्होटर-टाईम नाऊचे वर्तविलेले अंदाज येथेही साफ खोटे ठरले. भाजपा आणि मित्रपक्ष किमान 57 जागांवर विजयी होतील, असे या संस्थेने म्हटले होते. परंतु इतर सर्व संस्थांनी भाजपा आघाडी सत्ता काबीज करणार असा अंदाज वर्तविला होता, जो खरा ठरला. जवळपास सर्वच संस्थांनी केरळमध्ये डावी आघाडी सत्ता काबीज करणार, असा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरला असला तरी त्यांनी दिलेली आकडेवारी मात्र खोटी सिद्ध झाली. 

Web Title: Tamilnadu's guess is false!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.