जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 09:48 PM2024-11-01T21:48:24+5:302024-11-01T21:48:48+5:30
या घटनेत एका मजुराच्या हाताला, तर दुसऱ्याच्या पायाला गोळी लागली आहे.
Jammu-Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील मगम भागात 2 बिगर-काश्मिरी मजुरांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील सहानपूर येथील उस्मान मलिक (20) आणि सुफिया (25) या घटनेत जखमी झाले आहेत. उस्मानच्या उजव्या हाताला, तर सुफियानच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. दोघेही जलशक्ती विभागात रोजंदारीवर काम करत होते. सुदैवाने दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
Two non-locals shot at, injured in J-K's Budgam
— ANI Digital (@ani_digital) November 1, 2024
Read @ANI Story | https://t.co/gFDLymlkeQ#JammuAndKashmr#Budgam#firingpic.twitter.com/VCGqIs6ad2
गेल्या काही दिवसांत अनेक हल्ले
जम्मू-काश्मीरमध्ये गैर-काश्मिरींवर गोळीबार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा गैर-काश्मिरी नागरिकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. गेल्या आठवड्यात बटागुंड त्रालमध्ये गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये संघटित दहशतवाद कमी झाल्यानंतर टार्गेट किलिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गेल्या वर्षीही दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या भागात निवडकपणे बिगर काश्मिरींची हत्या केली होती. अनंतनाग, पुलवामा आणि पुंछमध्ये टार्गेट किलिंगच्या अनेक घटना घडल्या.
यापूर्वीही प्रकरणे उघडकीस आली आहेत
या वर्षी फेब्रुवारीमध्ये जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग करत हब्बा कादल भागात शीख समुदायाच्या दोन लोकांना एके रायफलने गोळ्या घातल्या. या हल्ल्यात अमृतसर येथील रहिवासी अमृत पाल आणि रोहित यांचा मृत्यू झाला. तर, फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची हत्या केली होती.